भाजपने केला बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्विट, राहुल गांधी अभिवादन करतील का?
नागपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा आज ‘न्याय यात्रेची’ नाटक कंपनी घेऊन राहुल गांधी मुंबईत शिवतीर्थावर येणार आहेत. आता उद्धव ठाकरे याच शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. भाजपने यासंदर्भात बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता. याच शिवतीर्थावरून हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली.
‘शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन,‘‘ असे रोखठोक बजावणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही शिवतीर्थावर आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत नाहीत. तुम्ही अभिवादन का करत नाहीत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस उद्धव ठाकरे दाखवणार का? वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न आहे याकडे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा :
चंद्रकांत पाटील सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी ‘सहयोग’वर
Sidhu Moosewala Mother: तंत्रज्ञानाची कमाल | सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८ व्या वर्षी दिला मुलाला जन्म; फोटो आला समोर
Lok Sabha Election 2024 | उत्तर महाराष्ट्रातील सहा जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान
Latest Marathi News भाजपने केला बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्विट, राहुल गांधी अभिवादन करतील का? Brought to You By : Bharat Live News Media.