प्रिया बापटला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूपच गाजणार आहे. कारण, बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले ते ‘बाईपण भारी देवा’ सारखा चित्रपट असू दे किंवा ‘झिम्मा २’. या गौरव सोहळ्यात महिला कलाकारांचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ … The post प्रिया बापटला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.
प्रिया बापटला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार जाहीर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूपच गाजणार आहे. कारण, बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले ते ‘बाईपण भारी देवा’ सारखा चित्रपट असू दे किंवा ‘झिम्मा २’. या गौरव सोहळ्यात महिला कलाकारांचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्काराची मानकरी मराठी अभिनेत्री प्रिया बापट ( Priya Bapat ) ठरली आहे.
संबंधित बातम्या 

Priya Bapat : तेच जर मराठी अभिनेत्रींनी केलं तर संस्कृती आड का येते? प्रियाने सुनावले…
आता संस्कृतीचे धडे-ज्ञान नका पाजळू; Priya Bapat च्या ‘त्या’ हॉट फोटोंवर…
संस्कृतीचा बुरखा घेऊन रडणारेच जास्त…Priya Bapat च्या Bikini फोटोवर…

मोठेपणी नेमकं काय करायचं हा प्रश्न तिला कधीच पडला नाही. कारण ‘कबुतरखाना, दादर मुंबई २८’ इथुन घरातून निघालेल्या तिच्या लहानग्या मनाला सगळंच करायचं होतं. तिला डेंटिस्ट पण व्हायचं होतं, शिवाजी पार्काला फे-या मारताना तिला क्रिकटर व्हावसं वाटायचं, स्टेशन रोडचा सकाळचा फुलबाजार पाहून फुलांची शेती कराविशी वाटत होते. इतकंच काय, तिला दाभण-दोरी घेऊन आपलीच चप्पल पण शिवायची होती!, पण ‘बालमोहन’, ‘विल्सन’, ‘रूईया’ असं मजल दरमजल ‘कुल्ड, वुल्ड, शुल्ड’अडथळे पार करत, तिला ‘शिवाजी मंदिर’ आणि ‘प्लाझाच्या’ मधल्या डिव्हाईडरवर उभं व्हावसं वाटलं…. ते खरं !
प्रियाने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. चित्रपट डॅा. बाबासाहेब आंबेडकर, दिग्दर्शक जब्बार पटेल! आणि मोठी झाल्यावर अभिनयाची दुसरी इनिंग सुरू केली ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाने, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबत. काही जण तिला आजही ‘दे धमाल’ मालिकेतली चिमुरडी म्हणूनच ओळखतात. काहीजण तिला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधली तर काहीजण ‘काकस्पर्श’ मधली उमा म्हणून ओळखतात. नाट्यरसिकांसाठी तीची ओळख सक्षम निर्माती म्हणून आहे. हिंदी वेबविश्वातल्या ‘सिटी ॲाफ ड्रिम्स’ या बेवमालिकेतल्या तिच्या खंबीर राजकीय भूमिकेचं खूप कौतुक झालं.

काकस्पर्श, हॅपी जर्नी, टाईमप्लिज, आम्ही दोघी ,वजनदार इ. तिच्या चित्रपटांची यादी जरी वाचली तरी त्यातलं वैविध्य आणि तिची विचारपूर्वकता दिसून येते. तिनं ‘नवा गडी नवं राज्य’ , ‘दादा, एक गुड न्यज आहे’ आणि ‘जर तर ची गोष्ट’ अशी तिन नाटकं अभिनेत्री आणि निर्माती या भूमिकेतून अत्यंत यशस्वीपणे सांभाळली. मराठी मालिका, मराठी नाटक, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, हिंदी वेबसिरीज, जाहिरात, अभिनय, निर्माती अशा अनेक क्षेत्रात तिचा वावर सातत्यपूर्ण आणि दर्जेदार आहे.
मालिका-चित्रपट ते वेबसिरिज व्हाया रंगभूमी अशी वाटचाल करणारी बहुरंगी प्रसन्न व्यक्तिमत्व असलेली प्रिया बापट. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. झी मराठीकडून सदिच्छा. तुला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. असे निर्मात्यांनी म्हटलं आहे. ( Priya Bapat )
Latest Marathi News प्रिया बापटला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.