पंजाबमधील गुरूद्वारात निहंग शिख- पोलिसांत धुमश्चक्री; पोलिसाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंजाबमधील कपूरथला येथील गुरुद्वारामध्ये निहंग शिखांच्या गटाने केलेल्या गोळीबारात एक पोलिस ठार झाला. तर अन्य तीन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान ४० ते ५० निहंग शिखांनी गुरुद्वारावरात हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Punjab News कपूरथलाचे एसपी तेजबीर सिंह हुंदल यांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, पोलीस … The post पंजाबमधील गुरूद्वारात निहंग शिख- पोलिसांत धुमश्चक्री; पोलिसाचा मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

पंजाबमधील गुरूद्वारात निहंग शिख- पोलिसांत धुमश्चक्री; पोलिसाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंजाबमधील कपूरथला येथील गुरुद्वारामध्ये निहंग शिखांच्या गटाने केलेल्या गोळीबारात एक पोलिस ठार झाला. तर अन्य तीन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान ४० ते ५० निहंग शिखांनी गुरुद्वारावरात हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Punjab News
कपूरथलाचे एसपी तेजबीर सिंह हुंदल यांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, पोलीस काही निहंग शीखांना अटक करण्यासाठी आले होते. दरम्यान निहंग शिखांनी पोलिसांवर हल्ला करत गोळीबार केला. यावेळी पोलिस रस्त्यावर उभे होते तेव्हा निहंगांनी त्यांच्यावर देखील गोळीबार केला. यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. (Punjab News)
कपूरथला येथील सुलतानपूर लोधी गुरुद्वारा येथील अकाल बुंगाच्या ऑपरेशनवरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. निहंग शिखांचा एक गट गुरुद्वारा चालवतो. तर दुसऱ्या गटातील ३० हून अधिक निहंग शिखांनी ते ताब्यात घेतले आहे. पहिल्या गटाच्या तक्रारीवरून पोलीस अतिक्रमण हटवण्यासाठी आणि काही निहंगांना अटक करण्यासाठी आले असता निहंग शिखांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी निहंग शिखांनी केलेल्या गोळीबारात एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Punjab News)

#WATCH | Sultanpur Lodhi, Punjab: A clash erupted between Nihang Singhs and Police officials at a Gurudwara Akal Bunga in Kapurthala. Further details awaited. pic.twitter.com/mLLbYRK7vJ
— ANI (@ANI) November 23, 2023

हेही वाचा:

जीवावर बेतले, पण वाचविला जीव; फुफ्फुसे बोलली, अरे हाच खरा शिव! फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी
Leopards Story : गंध, श्रवण अन् दृष्टिज्ञानात बिबट्या वाघ, सिंहापेक्षा सरस

The post पंजाबमधील गुरूद्वारात निहंग शिख- पोलिसांत धुमश्चक्री; पोलिसाचा मृत्यू appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंजाबमधील कपूरथला येथील गुरुद्वारामध्ये निहंग शिखांच्या गटाने केलेल्या गोळीबारात एक पोलिस ठार झाला. तर अन्य तीन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान ४० ते ५० निहंग शिखांनी गुरुद्वारावरात हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Punjab News कपूरथलाचे एसपी तेजबीर सिंह हुंदल यांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, पोलीस …

The post पंजाबमधील गुरूद्वारात निहंग शिख- पोलिसांत धुमश्चक्री; पोलिसाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source