रामटेकवर भाजपचा दावा, शिंदेंनी मोठे मन करावे:  बावनकुळे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील भंडारा-गोदिया व गडचिरोली या भाजपाच्या तर रामटेक, यवतमाळ वाशिम ही जागा शिंदे यांच्याकडे आहे. अमरावती व बुलडाणाबाबत लवकर निर्णय होईल, नागपूर जिल्ह्यातील रामटेकची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करीत आहोत. रामटेकसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे मन करावे. अखेर चर्चा होऊन कुणालातरी मागे पाऊल घ्यावे लागेल, असे … The post रामटेकवर भाजपचा दावा, शिंदेंनी मोठे मन करावे:  बावनकुळे appeared first on पुढारी.

रामटेकवर भाजपचा दावा, शिंदेंनी मोठे मन करावे:  बावनकुळे

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : विदर्भातील भंडारा-गोदिया व गडचिरोली या भाजपाच्या तर रामटेक, यवतमाळ वाशिम ही जागा शिंदे यांच्याकडे आहे. अमरावती व बुलडाणाबाबत लवकर निर्णय होईल, नागपूर जिल्ह्यातील रामटेकची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करीत आहोत. रामटेकसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे मन करावे. अखेर चर्चा होऊन कुणालातरी मागे पाऊल घ्यावे लागेल, असे संकेत आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
 बावनकुळे म्हणाले की, २५ तारखेपर्यंत महायुतीच्या सर्व जागांबाबतचे चित्र स्पष्ट होईल. महायुतीचे घटक पक्षाचे नेते व भाजपचे वरिष्ठ नेते आपसांत चर्चा करून ठरवितील.  आरोप- प्रत्यारोप न करता खिलाडूवृत्तीने सर्वांनी ही निवडणूक लढावी. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात एनडीए 400 प्लस जागांवर विजय मिळवेल. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानाची शपथ घेतील. तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे ४५ खासदार शपथविधीला उपस्थित राहतील.  प्रत्येक बुथवर ५१ % मते मिळतील, यासाठी भाजप काम करेल. विजयासाठी भाजप महायुतीमधील घटक पक्षांना मदत करणार आहे, आम्ही कुठेही गाफील राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा 

नागपूर : रामटेकच्या गडावर कुणाचा दावा ? बावनकुळे म्हणाले….
शिवसेनेचे आमदार परत जाणारच नाहीत : बावनकुळे यांचा दावा
Chandrasekhar Bawankule : हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी ‘सीएए’वर उत्तर द्यावे : चंद्रशेखर बावनकुळे 

Latest Marathi News रामटेकवर भाजपचा दावा, शिंदेंनी मोठे मन करावे:  बावनकुळे Brought to You By : Bharat Live News Media.