Indian Navy : भारतीय नौदल पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; सोमालियाच्या किनारपट्टीवर चाच्यांना शिकवला धडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी आणि अरबी महासागरात भारतीय नौदलाच्या वाढत्या प्रभावाचे आणखी एक उदाहरण पाहायला मिळाले आहे. भारतीय नौदलाच्या कमांडोंनी शनिवारी (दि. १६) सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळील समुद्रात सोमालियन चाच्यांचा जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर जहाजातील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलांच्या कमांडोंनी धाडसी ऑपरेशन सुरू केले आहे. चाच्यांपासून जहाज वाचवण्यासाठी भारतीय मरीन कमांडो फोर्स, … The post Indian Navy : भारतीय नौदल पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; सोमालियाच्या किनारपट्टीवर चाच्यांना शिकवला धडा appeared first on पुढारी.

Indian Navy : भारतीय नौदल पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; सोमालियाच्या किनारपट्टीवर चाच्यांना शिकवला धडा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हिंदी आणि अरबी महासागरात भारतीय नौदलाच्या वाढत्या प्रभावाचे आणखी एक उदाहरण पाहायला मिळाले आहे. भारतीय नौदलाच्या कमांडोंनी शनिवारी (दि. १६) सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळील समुद्रात सोमालियन चाच्यांचा जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर जहाजातील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलांच्या कमांडोंनी धाडसी ऑपरेशन सुरू केले आहे. चाच्यांपासून जहाज वाचवण्यासाठी भारतीय मरीन कमांडो फोर्स, भारतीय नौदलाचे विशेष दल यांनी ही कारवाई केली. (Indian Navy)
डिंसेबर 2023 मध्ये केले होते जहाजाचे अपहरण
एमव्ही रुएन या जहाजाचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते. त्यावेळीही नौदलाने चाच्यांच्या तावडीतून जहाज वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यादरम्यान नौदलाने क्रू मेंबर्सपैकी एकाची सुटका केली होती. एमव्ही रुएनचा वापर समुद्री चाच्यांनी इतर जहाजे लुटण्यासाठी केला होता. (Indian Navy)
नौदलाने 15 मार्च रोजी सोमालियाच्या पूर्व किनाऱ्यावर एमव्ही रुएन हे जहाज अडवले. नौदलाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय नियमानुसार समुद्री चाच्यांवर कारवाई केली जात आहे. नौदलाने एक निवेदन जारी करून म्हटले की, ‘भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर चाच्यांनी गोळीबार केला. यानंतर जहाजावर उपस्थित चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले. परंतु, त्यांनी नौदलावर हल्ला केला. या हल्लाला प्रत्यत्तुर देण्यासाठी भारतीय नौदलाने कारवाई सुरू केली.
समुद्री चाच्यांपासून वाचवलेले जहाज माल्टा देशाचे आहे, ज्याचे 14 डिसेंबर 2023 रोजी एडनच्या आखातातून समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते. त्यावेळीही नौदलाने एमव्ही रुएनच्या मदतीसाठी आपली युद्धनौका पाठवली होती. यावेळी नौदलाने एका खलाशाची सुटका केली होती. हे जहाज कोरियाहून तुर्कीकडे जात असताना त्याचे अपहरण करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच केली होती बांगलादेशी जहाजाची सुटका
भारतीय नौदलाने नुकतेच हिंदी महासागरात सोमालियन चाच्यांपासून बांगलादेशी जहाजाची सुटका केली होती. 12 मार्च रोजी 15-20 सशस्त्र चाच्यांनी हिंद महासागरात मोझांबिकहून संयुक्त अरब अमिरातीकडे जाणाऱ्या बांगलादेशी व्यापारी जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याच्या वेळी जहाजावर बांगलादेशचे 23 क्रू मेंबर्स होते. अपहरणाची माहिती मिळताच नौदलाने प्रत्युत्तर देत बांगलादेशी जहाजाच्या सुटकेसाठी भारतीय युद्धनौका रवाना केली. 14 मार्च रोजी सकाळी नौदलाने बांगलादेशी जहाजाची सुटका केली.

Indian Navy has established communication with the crew of the merchant vessel. The 15-plus crew are from Bulgaria, Angola and Myanmar. The pirates had fired at the Indian Navy. The operation by commandos is on: Indian Navy officials pic.twitter.com/D6wow5o7Kb
— ANI (@ANI) March 16, 2024

हेही वाचा :

Pakistan | दहशतवाद पाकिस्तानच्या अंगलट; लष्करावर आत्मघाती हल्ला, ७ सैनिक मृत्युमुखी
Sai Resort : सदानंद कदम यांची साई रिसॉर्टमधील अनधिकृत बांधकाम तोडण्याची तयारी
नागपुरातील काही भागात वादळी पावसासह गारपीट

Latest Marathi News Indian Navy : भारतीय नौदल पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; सोमालियाच्या किनारपट्टीवर चाच्यांना शिकवला धडा Brought to You By : Bharat Live News Media.