दहशतवाद पाकिस्तानच्या अंगलट; लष्करावरच आत्मघाती हल्ला, ७ सैनिक मृत्युमुखी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या एका लष्करी चौकीवर आत्मघाती हल्ला झालेला आहे, यात ७ सैनिक मारले गेले आहेत. तर लष्करी कारवाईत ६ दहशतवादी ठार झाले आहेत. उत्तर वझिरिस्तान येथे अफगाणिस्तानच्या सीमेला लागून ही लष्करी चौकी आहे. हा जिल्हा खैबर पख्तुनवा या प्रांतात आहे.  (Pakistan) स्फोटकांनी भरलेल्या वाहनाच्या मदतीने हे हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी लष्कराने … The post दहशतवाद पाकिस्तानच्या अंगलट; लष्करावरच आत्मघाती हल्ला, ७ सैनिक मृत्युमुखी appeared first on पुढारी.

दहशतवाद पाकिस्तानच्या अंगलट; लष्करावरच आत्मघाती हल्ला, ७ सैनिक मृत्युमुखी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या एका लष्करी चौकीवर आत्मघाती हल्ला झालेला आहे, यात ७ सैनिक मारले गेले आहेत. तर लष्करी कारवाईत ६ दहशतवादी ठार झाले आहेत. उत्तर वझिरिस्तान येथे अफगाणिस्तानच्या सीमेला लागून ही लष्करी चौकी आहे. हा जिल्हा खैबर पख्तुनवा या प्रांतात आहे.  (Pakistan)
स्फोटकांनी भरलेल्या वाहनाच्या मदतीने हे हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या कारवाईत ६ दहशतवादी मारले गेले. यातील काही दहशतवाद्यांच्या शरीराभोवती स्फोटके बांधण्यात आली होती. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए फुरसान इ मोहम्मद या संघटनेने घेतली आहे. (Pakistan)

Attack on Pakistan military post kills 5 security force members, military says https://t.co/sFkeWkcUUw pic.twitter.com/b8cBf1tvAS
— Reuters (@Reuters) March 16, 2024

दहशतवाद्यांनी या चौकीवर स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवले आणि त्यानंतर काही आत्मघाती हल्ले केले, यामुळे चौकीच्या इमारतीचा काही भाग कोसळला, त्यात ५ सैनिकांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोघांचा मृत्यू दहशतवाद्यांशी लढताना झाला, असे पाकिस्तानच्या लष्कराने सांगितले आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
हेही वाचा

अधिमान्यता नसलेले पाकिस्तानातील सरकार!

हल्दवानी हिंसाचारामागे पाकिस्तानचे टूलकिट

पाकिस्तान-तालिबानमधील संघर्ष झळा

Latest Marathi News दहशतवाद पाकिस्तानच्या अंगलट; लष्करावरच आत्मघाती हल्ला, ७ सैनिक मृत्युमुखी Brought to You By : Bharat Live News Media.