परभणी : मरसूळ‌‌ गाव भाजीपाला उत्पादनात ठरतेय अग्रेसर

पूर्णा: तालुक्यातील मरसूळ‌‌ हे गाव तसं लहान पण भाजीपाला उत्पादनात अग्रेसर ठरु लागले आहे. पूर्णापासून हे गाव पूर्व दिशेला पांगरा रोड हनुमाननगरपासून उत्तरेस २ किमी अंतरावर आहे. येथील घराची संख्या अवघी ६५ तर एकूण शेतीक्षेत्र ३५० हेक्टरच्या आसपास. ४० हेक्टर क्षेत्रावर विविध वाणांचा बारमाही भाजीपाला लागवड केला जातो. धरणाच्या कालव्याचे पाणी येत नाही. परंतु, येथील … The post परभणी : मरसूळ‌‌ गाव भाजीपाला उत्पादनात ठरतेय अग्रेसर appeared first on पुढारी.

परभणी : मरसूळ‌‌ गाव भाजीपाला उत्पादनात ठरतेय अग्रेसर

आनंद ढोणे

पूर्णा: तालुक्यातील मरसूळ‌‌ हे गाव तसं लहान पण भाजीपाला उत्पादनात अग्रेसर ठरु लागले आहे. पूर्णापासून हे गाव पूर्व दिशेला पांगरा रोड हनुमाननगरपासून उत्तरेस २ किमी अंतरावर आहे. येथील घराची संख्या अवघी ६५ तर एकूण शेतीक्षेत्र ३५० हेक्टरच्या आसपास. ४० हेक्टर क्षेत्रावर विविध वाणांचा बारमाही भाजीपाला लागवड केला जातो. धरणाच्या कालव्याचे पाणी येत नाही. परंतु, येथील जिद्दी शेतकरी विहीर, बोअरवेल खोदून भाजीपाला पिकवून स्वत: बाजारात विक्री करतात. Parbhani News
येथील शेतकरी बहुतांश अल्पभूधारक आहे. मागील सत्तर वर्षांपासून उदरनिर्वाहाचे एकमेव‌ नगदी पीक म्हणून भाजीपाल्याकडे पाहिले जाते. येथील कष्टाळू शेतकरी आपल्या शेतीच्या एकूण क्षेत्रापैकी पंचवीस टक्के जमिनीत बारमाही भाजीपाला पीक घेतात. टोमॅटो, वांगी, पडवळ, भोपळा, गवार, पठाडी, दिलपसन, काकडी, मिरची, फूलपत्ता कोबी, पालक, मेथी, शेपू, कांदा, कोथंबीर, कारले, वाल, गाजर, भेंडी, दोडका, अद्रक आदी भाजीपाला पिकवला जातो. तसेच टरबूज, खरबूजाची शास्रयुक्त पध्दतीने लागवड करुन भरघोस उत्पादन घेतात. Parbhani News
येथून दररोज पाच ते सात टन भाजीपाला पूर्णा, वसमत, नांदेड, पालम, जवळाबाजार, ताडकळस आदी ठिकाणी शेतकरी स्वतः विक्री करतात. काहीकडे संत्रा बागही आहे. एखाद्या गावात लग्न, हरिनाम सप्ताहाचे भोजन कार्यक्रम असले की मरसूळ‌‌ येथून लोक ताजा भाजीपाला खरेदी करतात. हिवाळी हंगामात तर येथून टेंपोने भाजीपाला उत्पादीत होतो. या शेतक-यांना बारमाही भाजीपाला पिकवण्याचा हातखंडा असून कोणत्या हंगामात कोणते भाजीपाला पीक घ्यावे, आणि कोणत्या भाजीस कधी भाववाढ मिळते? याचा चांगलाच अनुभवही आहे.
केवळ भाजीपाला विक्रीच्या पैशातून अनेक शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधली आहे. भाजीपाला विक्रीच्या उत्पन्नातून दररोज हजारो तर हिवाळी हंगामामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे अतिशय लहान असलेल्या मरसुळ गावची ख्याती भाजीपाला उत्पादनात सर्वदूर पसरली आहे.
आमच्या पूर्वजांनी विहिरीच्या मोटेवरील पाण्यावर भाजीपाला पिकवून बाजारात विक्री केली. त्यानंतरच्या पिढीनेही त्यांचा वसा कायम ठेवला आहे. आम्ही बाराही महिने भाजीपाला लागवड करुन विक्री करत आहे. आमच्या गावी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शेतकरी घेतात. यातून‌ आम्ही चांगली आर्थिक प्रगती केली आहे. इतरही शेतकरी आमच्याकडून प्रेरणा घेतात. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
– सुर्यभान शिंदे, गणपतराव शिंदे, पंडित शिंदे, दौलत शिंदे, गंगाधर कदम, रंगनाथराव शिंदे
भाजीपाला उत्पादक शेतकरी, मरसूळ‌‌, ता. पूर्णा
हेही वाचा 

परभणी: पूर्णा येथील रेल्वे उड्डाणपूलाचा रस्ता ठरतोय जीवघेणा; ठेकेदाराचे दुर्लक्ष
परभणी: अंबराई बहरली कैऱ्यांनी; यंदा मुबलक आंबा मिळणार
परभणी : झिरोफाटा, भारती कॅम्पजवळ कार उलटली; तलाठी ठार, ५ जण जखमी

Latest Marathi News परभणी : मरसूळ‌‌ गाव भाजीपाला उत्पादनात ठरतेय अग्रेसर Brought to You By : Bharat Live News Media.