मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात के. कविता यांना ईडी कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने यांना ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. कोर्टाने के.कविता यांची शनिवार २३ मार्चपर्यंत ईडीकडे कोठडी मंजूर केली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. ( K Kavitha in Custody) #UPDATE | … The post मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात के. कविता यांना ईडी कोठडी appeared first on पुढारी.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात के. कविता यांना ईडी कोठडी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने यांना ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. कोर्टाने के.कविता यांची शनिवार २३ मार्चपर्यंत ईडीकडे कोठडी मंजूर केली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. ( K Kavitha in Custody)

#UPDATE | Delhi’s Rouse Avenue court granted custody remand of BRS MLC K Kavitha to ED till 23 March. ED sought ten days remand of K Kavitha in connection with Delhi Excise policy case. https://t.co/ApzLUaXo1z
— ANI (@ANI) March 16, 2024

 K Kavitha in Custody: ‘माझी अटक बेकायदेशीर’; के. कविता
दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात बीआरएसच्या के. कविता यांना काल (दि.१५) ईडीने हैद्राबाद (तेलंगणा) येथून अटक केली. त्यानंतर त्यांना आज (दि.१६) दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान के.कविता यांना ‘माझी अटक बेकायदेशीर’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ( K Kavitha in Custody)
ईडी समन्सकडे दुर्लक्ष, अखेर कारवाई
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने 21 फेब्रुवारी रोजी के कविता यांना समन्स बजावून 26 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर ईडीने कारवाई करत कविता यांच्या हैदराबाद येथील घरावर छापा टाकला. यादरम्यान, काही तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर कविता यांना ताब्यात घेतले. ( K Kavitha in Custody)
के. कविता यांच्यावर ‘हे’ आहेत आरोप?
के. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत. दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान के. कविता यांचे नाव घेतले होते. त्यानंतर कविता ईडीच्या रडारवर आल्या. ईडीने आरोप केला आहे की ‘साउथ ग्रुप’ नावाच्या लिकर लॉबीनं आणखी एक आरोपी विजय नायर यांच्यामार्फत ‘आप’ नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिली होती. आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे दिल्ली मद्य धोरण प्रकरणी आधीच तुरुंगात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही उत्पादन शुल्क धोरणाबाबत ईडी सातत्याने समन्स पाठवत आहे. मात्र, ईडीकडून समन्स आल्यानंतरही सीएम केजरीवाल एकदाही चौकशीसाठी गेलेले नाहीत. त्यांनी ईडीचे समन्स बनावट आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.
 
Latest Marathi News मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात के. कविता यांना ईडी कोठडी Brought to You By : Bharat Live News Media.