रत्नागिरी: दापोलीत खेळण्यातील ईव्हीएम मशीन सापडली; पोलिसांची तारांबळ

दापोली; पुढारी वृतसेवा : दापोली तालुक्यातील गावतळे गावात ईव्हीएम मशीन सापडल्याची बातमी आज (दि.१६) सकाळी दापोली तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. Ratnagiri News दापोली पोलिसांनी थेट गावतळे गाठून ईव्हीएम मशीन सापडलेल्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, पाहणीअंती त्या ईव्हीएम मशीन नसून शाळेतील मुलांची खेळणी असल्याचे निदर्शनास … The post रत्नागिरी: दापोलीत खेळण्यातील ईव्हीएम मशीन सापडली; पोलिसांची तारांबळ appeared first on पुढारी.

रत्नागिरी: दापोलीत खेळण्यातील ईव्हीएम मशीन सापडली; पोलिसांची तारांबळ

दापोली; Bharat Live News Media वृतसेवा : दापोली तालुक्यातील गावतळे गावात ईव्हीएम मशीन सापडल्याची बातमी आज (दि.१६) सकाळी दापोली तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ उडून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. Ratnagiri News
दापोली पोलिसांनी थेट गावतळे गाठून ईव्हीएम मशीन सापडलेल्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, पाहणीअंती त्या ईव्हीएम मशीन नसून शाळेतील मुलांची खेळणी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. Ratnagiri News
लोकसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजले आहे. त्यामुळे देशातील आणि राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दापोलीत ईव्हीएम मशीन सापडल्याची बातमी पसरली. याबाबत दापोली पोलीस यांच्याशी संपर्क साधला असता गावतळेत कोणतीही ईव्हीएम मशीन आढळून आलेली नाही. मुलांची शाळेची खेळणी आहेत. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस यंत्रणा सर्व ठिकाणी चोख लक्ष ठेऊन आहे, असे पोलिसांनी सांगितले.

रत्नागिरीतील निर्भय बनो सभेच्या स्टेजवर जाण्यापूर्वीच असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांना पोलिसांची नोटीस
Ratnagiri BJP | रत्नागिरी: दापोलीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या स्टेटसवरून चर्चांना उधाण
Lok Sabha Election 2024 : मुंबईतील जागांच्या बदल्यात शिंदेंचा ठाणे, रत्नागिरीवर दावा

Latest Marathi News रत्नागिरी: दापोलीत खेळण्यातील ईव्हीएम मशीन सापडली; पोलिसांची तारांबळ Brought to You By : Bharat Live News Media.