तुमच्या मतदारसंघात मतदान केव्हा? जाणून घ्या महाराष्ट्रातील निवडणूक तारखा

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रिय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे आज (दि.१६) वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थाने लोकसभा उत्सवाला प्रारंभ झाला आहे. मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकांची आज (दि.१६) पत्रकार परिषदेत घोषणा केली. दरम्यान आयुक्तांनी देशभरातील लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडणार असून, ४ जून या एकाच दिवशी लोकसभा निवडणुक निकाल जाहीर … The post तुमच्या मतदारसंघात मतदान केव्हा? जाणून घ्या महाराष्ट्रातील निवडणूक तारखा appeared first on पुढारी.

तुमच्या मतदारसंघात मतदान केव्हा? जाणून घ्या महाराष्ट्रातील निवडणूक तारखा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: केंद्रिय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे आज (दि.१६) वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थाने लोकसभा उत्सवाला प्रारंभ झाला आहे. मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकांची आज (दि.१६) पत्रकार परिषदेत घोषणा केली. दरम्यान आयुक्तांनी देशभरातील लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडणार असून, ४ जून या एकाच दिवशी लोकसभा निवडणुक निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले. (Lok Sabha Election date 2024)
लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी, पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी, सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी आणि सातव्या टप्प्यांतील मतदान १ जून रोजी होईल आणि मतमोजणी ४ जून होईल, असे राजीव कुमार यांनी सांगितले. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जाणून घेऊया राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कधी मतदान होणार? (Lok Sabha Election date 2024)
महाराष्ट्रात मतदारसंघनिहाय मतदान तारखा पुढील प्रमाणे
◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
हे ही वाचा:  

Lok Sabha Election date 2024 | ब्रेकिंग! लोकशाही उत्सवाला प्रारंभ! लोकसभेसाठी ७ टप्प्यांत मतदान, जाणून घ्या मतदान आणि निकालाची तारीख
Lok Sabha Election Date 2024: लोकसभा महासंग्राम; महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणुका; २० मे रोजी अंतिम टप्प्यातील मतदान, ४ जूनला निकाल
Assembly Election 2024 Dates | आंध्र प्रदेशसह ४ राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर, ‘अशा’ आहेत राज्यनिहाय मतदान तारखा

 
Latest Marathi News तुमच्या मतदारसंघात मतदान केव्हा? जाणून घ्या महाराष्ट्रातील निवडणूक तारखा Brought to You By : Bharat Live News Media.