डीपीला पैसे दिले नाही म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न, सात जणांवर गुन्हा
पिंपळनेर: (जि.धुळे) Bharat Live News Media वृत्तसेवा- शेताजवळील डीपीला पैसे दिले नाही म्हणून राग आलेल्या सात जणांनी साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथील वैराट सोलर कंपनी परिसरात हातात तलवार घेत इसमास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मारेकऱ्यांच्या हाती न लागल्याने इसमाचे प्राण वाचले.
वैराट सोलर कंपनीचे सुपरवायझर दगडु तुळशिराम कोरडकर (वय 32) रा.रायपुर, ता.साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेताजवळील डीपीला पैसे दिले नाही म्हणून तसेच मागील भांडणाचा वचपा काढण्यासाठी निलेश नारायण थोरात, सुरेश गोमा थोरात, दिलीप काळु थोरात, दादाभाई चिंतामण थोरात, देवीदास किसन थोरात, वामन दामु मारनर सर्व रा.रायपुर, ता.साक्री हे कंपनी परिसरात पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एका वाहनासह दाखल झाले. यावेळी निलेश थोरात याच्या हातात तलवार होती. दरम्यान,कंपनीची लाईट गेल्याने पहाणी करण्याकरीता वाहन घेवून बाहेर पडलो असता निलेश थोरात याची नजर पडल्याने त्याने दगड फेकून मारला. जीव वाचविण्याकरीता वाहनातून उतरून पळ काढला असता त्यांनी पाठलाग केला. सुदैवाने एका ठिकाणी लपल्याने जीव वाचला. त्यानंतर वरील इसमांनी एम.एच.18/बीसी 7649 या बोलेरो वाहनावर दगडफेक केली.
या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात वरील सात संशयितांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि एच.एल.गायकवाड करीत आहेत.
हेही वाचा-
Lok Sabha Election Date 2024: लोकसभा महासंग्राम; महाराष्ट्रात ५ टप्प्यात लोकसभा निवडणुका; ७ मे रोजी पहिला टप्पा
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत महायुती सर्व रेकॉर्ड मोडेल : देवेंद्र फडणवीस
Latest Marathi News डीपीला पैसे दिले नाही म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न, सात जणांवर गुन्हा Brought to You By : Bharat Live News Media.