भर सभेत ढसाढसा रडले आमदार
भरतपूर; वृत्तसंस्था : काँग्रेसची प्रचार सभा होती. काँग्रेस उमेदवार अमरसिंह जाटव बोलत होते. मंचावर येऊन एकाने त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. काय सांगितले, माहिती नाही; पण जाटव यांचे भाषण क्षणभर थांबले… कानात पाझरलेले कार्यकर्त्याचे हे कथनकारुण्य थेट जाटव यांच्या डोळ्यातून वाहू लागले. त्यांना हुंदका भरून आला आणि मग ते ढसाढसा रडू लागले.
मला आई-वडील नाहीत… असे काहीतरी बोलले, मग म्हणाले माझ्या मागे आता फक्त लोकांचाच आशीर्वाद आहे. मी जोवर जगेन याच माझ्या मतदार मायबापांसाठी जगेन… आणि सचिन पायलट यांची साथ कधीही सोडणार नाही. नंतर एक क्षण ते हबकले आणि माईक सोडून जमिनीवर बसले. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट मग उठले आणि जाटव यांना त्यांनी धीर दिला. स्वत:च्या डोक्यावरील पगडी पायलट यांनी काढली आणि ती जाटव यांना घातली… जाटव थोडे हसले आणि पुन्हा रडले… नंतरच्या त्यांच्या संपूर्ण भाषणाला हुंदक्यांची साथ होती. ते कुणीतरी चित्रबद्ध केले आणि व्हायरलही… कमेंट अर्थातच नाना तर्हेच्या होत्या… त्यातली एक होती, बाटना नहीं है पैसा, तो ड्रामा करो ऐसा..!
हेही वाचा :
भाजप सरकारमुळे अर्थव्यवस्थेची दुर्दशा : राहुल गांधी
काँग्रेस फक्त एका कुटुंबाची गुलाम : PM मोदींचा घणाघात
‘विवाह झाला याचा अर्थ महिलेने पालकांचे घर नाकारले असे नाही’
The post भर सभेत ढसाढसा रडले आमदार appeared first on पुढारी.
भरतपूर; वृत्तसंस्था : काँग्रेसची प्रचार सभा होती. काँग्रेस उमेदवार अमरसिंह जाटव बोलत होते. मंचावर येऊन एकाने त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. काय सांगितले, माहिती नाही; पण जाटव यांचे भाषण क्षणभर थांबले… कानात पाझरलेले कार्यकर्त्याचे हे कथनकारुण्य थेट जाटव यांच्या डोळ्यातून वाहू लागले. त्यांना हुंदका भरून आला आणि मग ते ढसाढसा रडू लागले. मला आई-वडील नाहीत… असे …
The post भर सभेत ढसाढसा रडले आमदार appeared first on पुढारी.