भंडारा : कवलेवाडा धरणावर आढळला तरूणीचा मृतदेह

भंडारा : पुढारी वृत्‍तसेवा सिहोरा व तिरोडाच्या मध्यभागी असलेल्या कवलेवाडा धरणावर एका तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. ही घटना पोलिस स्टेशन सिहोराच्या हद्दीत वांगी नदीपात्रात उघडकीस आली. तरुणीची हत्या की आत्महत्या याबाबतचे रहस्य कायम आहे. आचल धनराज कटरे (वय २०) रा. सराटी तालुका साकोली असे मृत तरुणीचे नाव आहे. मृतदेह … The post भंडारा : कवलेवाडा धरणावर आढळला तरूणीचा मृतदेह appeared first on पुढारी.

भंडारा : कवलेवाडा धरणावर आढळला तरूणीचा मृतदेह

भंडारा : Bharat Live News Media वृत्‍तसेवा सिहोरा व तिरोडाच्या मध्यभागी असलेल्या कवलेवाडा धरणावर एका तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. ही घटना पोलिस स्टेशन सिहोराच्या हद्दीत वांगी नदीपात्रात उघडकीस आली. तरुणीची हत्या की आत्महत्या याबाबतचे रहस्य कायम आहे.
आचल धनराज कटरे (वय २०) रा. सराटी तालुका साकोली असे मृत तरुणीचे नाव आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय तुमसर येथे पाठविण्यात आले असून, शवविच्छेदन अहवालानंतर या घटनेचे रहस्य समोर येणार आहे.
घटनास्थळावर पोलिस उपविभागीय अधिकारी रश्मिता राव, पोलिस स्टेशन सिहोराचे ठाणेदार नितीन मदनकर, राजू साठवने, संतोष सिदने, मनोज इळपाते यांनी दाखल होत पाहणी केली. सदर तरुणी ही कवलेवाडा धरणावर कशी आली हा परिसरात चर्चेचा विषय असून या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
हेही वाचा : 

Cabinet Decisions | वृद्ध साहित्यिक, कलाकारांना सरसकट ५ हजार रुपये मानधन, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
Teacher Dress Code : राज्यातील शिक्षकांना ड्रेसकोड लागू : जीन्स पँट, टी शर्ट घालण्यावर बंदी

Anuradha Paudwal joins BJP :प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Latest Marathi News भंडारा : कवलेवाडा धरणावर आढळला तरूणीचा मृतदेह Brought to You By : Bharat Live News Media.