रशियात पुन्‍हा ‘पुतिन सरकार’? पुतिन यांनी केले ऑनलाईन मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशिया राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Russian Presidential Elections) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी ( दि. १५ मार्च) ऑनलाइन मतदान केले. पुतीन देशाच्या सर्वोच्च पदासाठी पुन्हा स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. विशेष म्‍हणजे या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच तीन दिवस मतदान होत आहे. यंदा निवडणूक जिंकली तर पुतिन पुढील सहा वर्ष रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष असतील. त्‍यांच्‍या … The post रशियात पुन्‍हा ‘पुतिन सरकार’? पुतिन यांनी केले ऑनलाईन मतदान appeared first on पुढारी.
रशियात पुन्‍हा ‘पुतिन सरकार’? पुतिन यांनी केले ऑनलाईन मतदान

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : रशिया राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Russian Presidential Elections) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी ( दि. १५ मार्च) ऑनलाइन मतदान केले. पुतीन देशाच्या सर्वोच्च पदासाठी पुन्हा स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. विशेष म्‍हणजे या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच तीन दिवस मतदान होत आहे. यंदा निवडणूक जिंकली तर पुतिन पुढील सहा वर्ष रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष असतील. त्‍यांच्‍या कार्यकाळातच घटना दुरुस्‍ती करुन राष्‍ट्राध्‍यक्षपदाचा कार्यकाळा सहा वर्षांचा करण्‍यात आला होता.
3.5 दशलक्षाहून अधिक मतदारांनी केले ऑनलाईन मतदान
क्रेमलिनने प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये पुतिन हे त्यांच्या कार्यालयातील संगणकावर ऑनलाईन मतदान करताना दिसत आहेत. त्‍यांनी ऑनलाइन मतदान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्‍यांनी या निवडणुकीत ऑनलाईन मतदान केले आहे. दरम्‍यान, रशियामध्ये राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीच्या पहिल्या दिवशी 3.5 दशलक्षाहून अधिक मतदारांनी ऑनलाईन मतदान केल्‍याचे वृत्त रशियातील TASS वृत्तसंस्‍थाने दिले आहे. (Russian Presidential Elections)
रशियातील ड्यूमा वरिष्‍ठ सभागृहाने 17 मार्च 2024 ही राष्ट्राध्‍यक्ष निवडणुकीची तारीख जाहीर केली हाेती. मात्र यानंतर रशियन केंद्रीय निवडणूक आयोगाने (CEC) 15 ते 17 मार्च दरम्यान राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीत मतदान होईल,असे स्‍पष्‍ट केले होते. रशियामध्ये राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीसाठी पहिल्यांदाच तीन दिवस मतदान होत आहे. या निवडणुकीत पुतीन यांच्‍याविरोधात व्लादिस्लाव दाव्हान्कोव्ह, लिओनिड स्लुत्स्की आणि निकोले खारिटोनोव्ह हे निवडणूक लढवत आहेत.
२००० मध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीत व्लादिमीर पुतिन हे पहिल्‍यांदा रशियाचे अध्‍यक्ष झाले. यानंतर २००४, २०१२ आणि २०१८ मध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकांमध्‍ये सत्ता अबाधित ठेवण्‍यात त्‍यांना यश आले. आता पुन्‍हा एकदा रशियातील सत्तेची सूत्रे पुतिन आपल्‍याच हाती ठेवण्‍यात यशस्‍वी हाेतील, असे मानले जात आहे.

The incumbent Russian leader, Vladimir Putin, who is vying for the country’s top office as an independent candidate, has cast his electronic vote in the presidential election:https://t.co/q6nJSonePG pic.twitter.com/oEQGsEw2KB
— TASS (@tassagency_en) March 15, 2024

हेही वाचा :

Russia Military Plane Crash: रशियाचे लष्करी वाहतूक विमान कोसळले; १५ ठार
चीन-रशिया उभारणार चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प; अमेरिकेला चिंता
धक्‍कादायक..! महान बुद्धिबळपटू कास्पारोव्ह यांना रशियाने केले दहशतवादी घोषित

Latest Marathi News रशियात पुन्‍हा ‘पुतिन सरकार’? पुतिन यांनी केले ऑनलाईन मतदान Brought to You By : Bharat Live News Media.