इस्रायलने पॅलेस्टिनींना अल-अक्सा मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखले

पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझामध्ये इस्रायलचे हल्ले (Israel–Hamas war) सुरू असतानाच आता इस्रायलने पॅलेस्टिनींना जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत प्रवेश करण्यावर निर्बंध घातले आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात (Ramadan 2024) इस्त्रायलने वेस्ट बँकमधील हजारो पॅलेस्टिनींना अल-अक्सा मशिदीला भेट देण्यापासून रोखल्याने तणाव निर्माण झाला आहे. इस्रायली अधिका्यांनी वेस्ट बँकमधील हजारो पॅलेस्टिनींना अल-अक्सा मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखले. ‘अल जझीरा’ने दिलेल्या … The post इस्रायलने पॅलेस्टिनींना अल-अक्सा मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखले appeared first on पुढारी.

इस्रायलने पॅलेस्टिनींना अल-अक्सा मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गाझामध्ये इस्रायलचे हल्ले (Israel–Hamas war) सुरू असतानाच आता इस्रायलने पॅलेस्टिनींना जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत प्रवेश करण्यावर निर्बंध घातले आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात (Ramadan 2024) इस्त्रायलने वेस्ट बँकमधील हजारो पॅलेस्टिनींना अल-अक्सा मशिदीला भेट देण्यापासून रोखल्याने तणाव निर्माण झाला आहे.
इस्रायली अधिका्यांनी वेस्ट बँकमधील हजारो पॅलेस्टिनींना अल-अक्सा मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखले. ‘अल जझीरा’ने दिलेल्या वृत्तानुसार, अल अक्सा मशिदीमध्ये प्रवेश करण्यावर इस्रायलचे कडक निर्बंध असूनही रमजानच्या पहिल्या शुक्रवारच्या नमाजासाठी ८० हजार उपासक पोहचले होते. परंतु वेस्ट बँकमधील हजारो पॅलेस्टिनींना पूर्व जेरुसलेममध्ये प्रवेश नाकारण्यात आला. मशिदीच्या सभोवताली इस्त्रायची प्रचंड सुरक्षा आहे. केवळ ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मशिदीत प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. शिवाय सर्वांकडे वैध परवानगी असणे आवश्यक आहे.
पॅलेस्टिनी नॅशनल इनिशिएटिव्हचे सरचिटणीस मुस्तफा बारघौती यांनी सांगितले की, सर्व पॅलेस्टिनींपैकी ९५ टक्क्यांहून अधिक लोकांना अल-अक्सा मशिदीमध्ये प्रवेश करण्यास बंदी आहे. ज्यांना परवानगी आहे असे ५५ वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक खूपच कमी आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण निर्माण झाली असून लोक संतप्त आहेत. इस्रायलचे निर्बंध, लोकांना मारहाण आणि चिथावणी यामुळे मशिदीच्या आतमध्येही तणाव जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : 

मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या पॅलेस्टिनींवर इस्रायलचे हल्ले; ५६ जण ठार
अमेरिका राष्‍ट्राध्‍यक्षपदासाठी पुन्‍हा ट्रम्‍प- बायडेन आमने-सामने
पाहा व्हिडिओ! जपानच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपणानंतर सेकंदातच स्फोट
रशियाचे लष्करी वाहतूक विमान कोसळले; १५ ठार

Latest Marathi News इस्रायलने पॅलेस्टिनींना अल-अक्सा मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखले Brought to You By : Bharat Live News Media.