Loksabha election : बारामती लोकसभेत महायुतीचाच विजय होईल : भागवत कराड
बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विजयी होईल, यात शंका नाही. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे यांच्याशी त्या पक्षाचे वरिष्ठ नेते बोलून मार्ग काढतील असे मत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप आणि महायुतीची मोदींना तिसर्यांदा पंतप्रधान करण्याची भूमिका आहे. बारामतीचा महायुतीचा खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील, शिवतारे यांच्याशी चर्चा केली जाईल असेही त्यांनी सांगितले. उमेदवार यादीत उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, माझे पण नाव नाही. मी देखील इच्छुक आहे.
या यादीत लोकसभेत जे खासदार झालेले आहेत, त्यांची यादी जाहीर झाली आहे .दुसरी यादी मित्रपक्षांशी चर्चा करून जाहीर केली जाईल. त्यामुळे उदयनराजे हे नाराज होणार नाहीत. चंद्रकांत पाटील बारामतीत बैठक घेणार आहेत. त्याबद्दल ते म्हणाले, ही मनोमिलन बैठक नाही. लोकसभेची तयारी ही घटक पक्षांना घेऊन कशी होईल, यासाठी ही बैठक होईल, प्रत्येक विधानसभेतून सर्वपक्षीय दहा ते पंधरा पदाधिकारी अशी बैठक होईल. राज्यघटना बदलली जाणार असल्याच्या सुप्रिया सुळे यांच्या आरोपावर ते म्हणाले, त्या अनुभवी खासदार आहेत. त्यांनी केलेल्या अशा वक्तव्यामुळे मला हसू येत आहे. कुणीही घटना बदलू शकणार नाही. लोकांमध्ये अफवा पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा हा प्रयत्न आहे.
हेही वाचा
ठाणे : कोरोना लसीच्या कंपनीकडून भाजपला हप्ता : राहुल गांधी
विकासकामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये : आ. अशोक पवार
जांभूळवाडी तलावात माशांचा मृत्यू : परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य !
Latest Marathi News Loksabha election : बारामती लोकसभेत महायुतीचाच विजय होईल : भागवत कराड Brought to You By : Bharat Live News Media.