Leopard News : अखेर उंब्रज येथे दुसरा बिबट्याही जेरबंद !
नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील उंब्रज या ठिकाणी वनविभागाला दुसरा बिबट्या पकडण्यात शनिवारी (दि. १६) यश आल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली. काकडे यांनी सांगितले की, आयुष शिंदे या बालकावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे त्याच्या घराच्या परिसरामध्ये वनविभागाने १० पिंजरे तसेच १० ट्रॅप कॅमेरेही लावले आहेत. शुक्रवारी एक बिबट्या जेरबंद झाला तर शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दुसराही बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला आहे. आज पकडण्यात आलेल्या बिबट्याला देखील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे.
आयुष शिंदे या बालकावर ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला होता त्या ठिकाणच्या बिबट्याच्या पावलाचे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमातून ठसे घेण्यात आलेले आहेत. पकडलेल्या दोन्ही बिबट्यांच्या पंजाचे ठसे घेऊन एकमेकांशी मॅच होतात का ते पाहिले जाणार आहे. त्यातून कोणत्या बिबट्याने आयुषवर हल्ला केला हे समजू शकणार आहे. दरम्यान उंबज परिसरामध्ये अद्यापही ८ ते १० बिबटे आहेत असा अंदाज स्थानिक नागरिकांचा आहे. वनविभागाची २५ लोकांची टीम, १० ट्रॅप कॅमेरे व १० पिंजरे उंब्रज परिसरामध्ये अद्यापही लावण्यात आलेले आहेत.
हेही वाचा
नक्षलवादापासून सुटका झालेले मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनप्रवास लवकरच येणार मोठ्या पडद्यावर
Loksabha election : ‘वर्क ऑर्डर’साठी अधिकार्यांसह ठेकेदारांची धावपळ
कोल्हापूर, हातकणंगलेचा पेच कायम; यादी रखडली
Latest Marathi News Leopard News : अखेर उंब्रज येथे दुसरा बिबट्याही जेरबंद ! Brought to You By : Bharat Live News Media.