Breaking ! विजय शिवतारे पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल; केसरकरांनी घेतली भेट
पुणे : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क : नियमित तपासणीसाठी विजय शिवतारे काल ( दि. 15 मोर्च) रात्री पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवातरे रुग्णालयात दाखल झाले आहेत. या दरम्यान शिवसेना नेते दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे यांनी शिवतारे यांची भेट घेतली. बारामती लोकसभा मतदारसंघात आपण अजित पवार विरोधात लोकसभा निवडणुकीत उभे राहणार आहोत अशी भूमिका शिवतारे यांनी घेतली.
शिवतारेंच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये अडचणी निर्माण झाल्याच दिसतं आहे. विजय शिवतारे यांनीं थेट अजित पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार ह्या महायुतीच्या उमेदवार असतील असं बोललं जातंय तर शरद पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली गेली आहे. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे चित्र आहे.
हेही वाचा
नक्षलवादापासून सुटका झालेले मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनप्रवास लवकरच येणार मोठ्या पडद्यावर
Loksabha election : विमानतळ आणि मेट्रो विस्ताराला प्राधान्य : मुरलीधर मोहोळ
Loksabha election : ‘वर्क ऑर्डर’साठी अधिकार्यांसह ठेकेदारांची धावपळ
Latest Marathi News Breaking ! विजय शिवतारे पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल; केसरकरांनी घेतली भेट Brought to You By : Bharat Live News Media.