कोल्हापूर : बंडखोरीची गरज नाही, उमेदवारी निश्चितच; कार्यकर्त्यांचा विश्वास

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक आपणास नवीन नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पूर्ण करणारे नेते असल्याने उमेदवारी निश्चित आहे, बंडखोरीची गरज नाही, असा विश्वास व्यक्त करत उमेदवारीच्या चर्चेकडे लक्ष न देता कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन शुक्रवारी आयोजित केलेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आले. खा. संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या उलटसुलट … The post कोल्हापूर : बंडखोरीची गरज नाही, उमेदवारी निश्चितच; कार्यकर्त्यांचा विश्वास appeared first on पुढारी.

कोल्हापूर : बंडखोरीची गरज नाही, उमेदवारी निश्चितच; कार्यकर्त्यांचा विश्वास

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक आपणास नवीन नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पूर्ण करणारे नेते असल्याने उमेदवारी निश्चित आहे, बंडखोरीची गरज नाही, असा विश्वास व्यक्त करत उमेदवारीच्या चर्चेकडे लक्ष न देता कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन शुक्रवारी आयोजित केलेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आले. खा. संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेच्या पार्श्वभूमीवर दैवज्ञ बोर्डिंग येथे मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी जि. प.चे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील होते. उमेदवारीबाबत जाणीवपूर्वक संभ—मावस्था निर्माण केली जात असल्याचा आरोप मेळाव्यात करण्यात आला.
शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तेव्हाच लोकसभेची उमेदवारी निश्चित झाली आहे, असे सांगून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार म्हणाले, मंडलिकांना वगळून जिल्ह्याचे राजकारण होऊ शकत नाही. त्यामुळे विरोधकांनी आमची मापे काढू नयेत. यावेळीही जनताच पुन्हा एकदा आपले वेगळेपण दाखवून देईल. मंडलिकांना निवडणुका नवीन नाहीत. थेट संपर्क आणि जनतेचे काम ही संजय मंडलिक यांच्या कामाची पद्धत आहे. त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे संजय पाटील म्हणाले. खा. मंडलिक यांनी आपल्या मतदारसंघात 800 कोटीची विकास कामे केली पण त्याचा इव्हेंट केला नसल्याचे अतुल जोशी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणारे नेते असल्यामुळे बंडखोरीची आवश्यकताच नाही. असे मत बहुतेक वक्त्यांनी व्यक्त केले.
सर्जेराव पाटील, दत्ता उगले सुधीर बिरंजे, रामसिंग रजपूत, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, यांचीही भाषणे झाली. संजयसिंह साळोखे यांनी स्वागत केले. विजय बलुगडे यांनी आभार मानले. यावेळी अरुण जाधव, नागेश घोरपडे, पी.डी. पाटील, शेखर मंडलिक, रमेश पुरेकर आदी उपस्थित होते.
Latest Marathi News कोल्हापूर : बंडखोरीची गरज नाही, उमेदवारी निश्चितच; कार्यकर्त्यांचा विश्वास Brought to You By : Bharat Live News Media.