इस्रायलचे मदत केंद्रांवर हल्ले, ५६ पॅलेस्टिनी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायली सैन्याने गाझा पट्टीमध्ये मागील ४८ तासांत मदत वितरण केंद्रांवर पाच वेगवेगळे हल्ले केले आहेत. या हल्ल्यात ५६ लोक ठार झाले असून ३०० हून अधिक जखमी झाले आहेत, असा दावा पॅलेस्टाईनने केला आहे. गुरुवारी गाझा पट्टीमध्ये दोन वेगवेगळ्या इस्रायली हल्ल्यांमध्ये मदतीच्या प्रतीक्षेत असलेले २९ पॅलेस्टिनी ठार झाले होते. तर १५० हून … The post इस्रायलचे मदत केंद्रांवर हल्ले, ५६ पॅलेस्टिनी ठार appeared first on पुढारी.

इस्रायलचे मदत केंद्रांवर हल्ले, ५६ पॅलेस्टिनी ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इस्रायली सैन्याने गाझा पट्टीमध्ये मागील ४८ तासांत मदत वितरण केंद्रांवर पाच वेगवेगळे हल्ले केले आहेत. या हल्ल्यात ५६ लोक ठार झाले असून ३०० हून अधिक जखमी झाले आहेत, असा दावा पॅलेस्टाईनने केला आहे.
गुरुवारी गाझा पट्टीमध्ये दोन वेगवेगळ्या इस्रायली हल्ल्यांमध्ये मदतीच्या प्रतीक्षेत असलेले २९ पॅलेस्टिनी ठार झाले होते. तर १५० हून अधिक लोक जखमी झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते. पहिली घटना मध्य गाझा पट्टीतील अल-नुसीरत कॅम्पमध्ये घडली. येथील एका छावणीवर झालेल्या हवाई हल्ल्यात आठ जण ठार झाले. दुसऱ्या घटनेबाबत, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, उत्तर गाझा चौकात मदत ट्रकची वाट पाहत असलेल्या जमावावर इस्रायली सैन्यांनी गोळीबार केला. यामध्ये २१ लोक ठार झाले आणि १५० हून अधिक जखमी झाले. त्यानंतर गेल्या ४८ तासांत इस्रायलने मदत केंद्रांवर केलेल्या हल्ल्यात सुमारे ५६ लोक मारले गेले आहेत.
दरम्यान, “आम्ही यूएस प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला, ‘इस्रायली’ व्यवसायाव्यतिरिक्त, नरसंहाराच्या गुन्ह्यासाठी पूर्णपणे जबाबदार धरतो,” असे एन्क्लेव्ह सरकारच्या मीडिया कार्यालयाने टेलिग्रामवरील निवेदनात म्हटले आहे.
१३ हजार दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा
गाझा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३१ हजाराहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तर ७१,५०० हून अधिक जखमी झाले आहेत. या युद्धात हमासचे किमान १३ हजार दहशतवादी मारले गेल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : 

अन्नाच्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्‍या २० पॅलेस्टिनींचा गोळीबारात मृत्‍यू
पाहा व्हिडिओ! जपानच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपणानंतर सेकंदातच स्फोट
अमेरिका राष्‍ट्राध्‍यक्षपदासाठी पुन्‍हा ट्रम्‍प- बायडेन आमने-सामने

Latest Marathi News इस्रायलचे मदत केंद्रांवर हल्ले, ५६ पॅलेस्टिनी ठार Brought to You By : Bharat Live News Media.