परागीकरण कमी, ऑर्किडची पैदास घटली; फुलांच्या निर्यातीत भारत पिछाडीवर

पुणे : कीटकांची संख्या घटल्याने परागीकरण कमी झाले. परिणामी, भारतात ऑर्किड वनस्पतींची पैदास कमी झाली. त्यामुळे या सुंदर फुलांच्या निर्यातीत भारत जगात खूप मागे पडला आहे, अशी खंत ऑर्किड सोसायटी ऑफ इंडियाचे प्रमुख डॉ. ए. के. भटनागर यांनी व्यक्त केली. शहरातील पाषाण भागातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये आंतराष्ट्रीय ऑर्किड परिषद भरली आहे. ही परिषद शुक्रवारी आणि … The post परागीकरण कमी, ऑर्किडची पैदास घटली; फुलांच्या निर्यातीत भारत पिछाडीवर appeared first on पुढारी.

परागीकरण कमी, ऑर्किडची पैदास घटली; फुलांच्या निर्यातीत भारत पिछाडीवर

आशिष देशमुख

पुणे : कीटकांची संख्या घटल्याने परागीकरण कमी झाले. परिणामी, भारतात ऑर्किड वनस्पतींची पैदास कमी झाली. त्यामुळे या सुंदर फुलांच्या निर्यातीत भारत जगात खूप मागे पडला आहे, अशी खंत ऑर्किड सोसायटी ऑफ इंडियाचे प्रमुख डॉ. ए. के. भटनागर यांनी व्यक्त केली. शहरातील पाषाण भागातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये आंतराष्ट्रीय ऑर्किड परिषद भरली आहे. ही परिषद शुक्रवारी आणि शनिवारी असून, रविवारी महाबळेश्वर येथे वनस्पतीशास्त्रज्ञांची सहल जाणार आहे. ही परिषद ऑर्किड सोसायटी ऑफ इंडिया, बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, एनसीएल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बायोस्फिअर्स, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, बाबूराव घोलप कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आली आहे. यात देश-विदेशातील दिग्गज वनस्पतिशास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत.
ऑर्किड वाचवा, स्टार्टअप तयार करा
ऑर्किड सोसायटी ऑफ इंडियाचे प्रमुख डॉ. ए. के. भटनागर म्हणाले की, ऑर्किड सोसायटीची स्थापना होऊन तब्बल 40 वर्षे झाली, तरीदेखील आपण फारसे समाधानकारक काम या वनस्पतीच्या संरक्षण व संवर्धनासाठी करू शकलो नाही. भारतातून सोसायटीच्या प्रयत्नाने ती वनस्पती जगली. ती वाढविण्यासाठी तरुणांनी याचे स्टार्टअप तयार केले, तर आम्ही त्यासाठी मदत करू. च्यवनप्राश तयार करण्यासाठी ऑर्किड वनस्पती वापरल्या जातात.
हेही वाचा 

कोल्हापूर : महाद्वार, गरुड मंडप, मणकर्णिका कुंडाचे संवर्धन; 21 कोटी रुपये खर्च होणार
Loksabha election : आचारसंहितेची उलट गिणती सुरु..! झेडपीत कामांची लगीनघाई
अंबाबाई मूर्तीची पाहणी पूर्ण

Latest Marathi News परागीकरण कमी, ऑर्किडची पैदास घटली; फुलांच्या निर्यातीत भारत पिछाडीवर Brought to You By : Bharat Live News Media.