पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. तसेच शिक्षकांच्या नावामागे इंग्रजीत ‘टीआर’ आणि मराठीत ‘टी’ संबोधन लावण्याची सूचनाही देण्यात आली आहे. शिक्षकांनी शाळेत जीन्स, टीशर्ट परिधान करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसा शासन निर्णयच शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे. शिक्षक भावी पिढी घडवतात. जनमानसात त्यांच्याकडे गुरू, मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. शिक्षकांचा संबंध विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याशी येतो.
त्यामुळे अध्यापनाचे काम करताना आपला पेहराव शाळेला आणि पदाला अनुरूप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. शिक्षकाचा पेहराव अव्यवस्थित असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम व्यक्तिमत्त्वावर, तसेच विद्यार्थ्यांवर होतो असे नमूद करून शिक्षकांच्या पेहरावासंदर्भातील मार्गदर्शक सूचना दिल्या. महिला शिक्षकांनी साडी, चुडीदार-सलवार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने, तर पुरुष शिक्षकांनी शर्ट, ट्राउझर पँट, शर्ट इन करून पेहराव करावा. वैद्यकीय कारण असल्यास पुरुष, महिला शिक्षकांना बूट घालण्यातून सवलत द्यावी, स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचाच पेहराव असेल, असे नमूद करण्यात आले आहे. शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नावामागे इंग्रजीत ‘टीआर’ आणि मराठीत ‘टी’ संबोधन लावण्यात यावे, या संदर्भातील बोधचिन्ह शिक्षण आयुक्त यांनी निश्चित करावे, असेही स्पष्ट करण्यात आले.
मज्जाव असलेला पेहराव
शिक्षकांनी गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्रे असलेले कपडे परिधान करू नयेत. तसेच शिक्षकांनी शाळेत जीन्स, टीशर्ट परिधान करू नये, असे नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा
अंबाबाई मूर्तीची पाहणी पूर्ण
WPL : मुंबईला पराभूत करून बंगळूरु फायनलमध्ये
हिंगोली : बेपत्ता मुलाचा तलावात सापडला मृतदेह
Latest Marathi News आता शिक्षकही ‘गणवेशा’त; या पेहरावाला मज्जाव : शालेय शिक्षण विभागाचे निर्देश Brought to You By : Bharat Live News Media.