मुंबईला पराभूत करून बंगळूरु फायनलमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क : वुमन्स प्रीमियर लीगच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्याक आरसीबीने एमआयचा पाच धावांनी पराभव केला. स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (दि. 17 मार्च) बंगळूरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. दिल्लीने उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. … The post मुंबईला पराभूत करून बंगळूरु फायनलमध्ये appeared first on पुढारी.

मुंबईला पराभूत करून बंगळूरु फायनलमध्ये

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : वुमन्स प्रीमियर लीगच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्याक आरसीबीने एमआयचा पाच धावांनी पराभव केला. स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (दि. 17 मार्च) बंगळूरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. दिल्लीने उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (WPL)
बंगळुरू आणि मुंबई यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या एलिस पेरीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत 6 गडी गमावून 135 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 130 धावा करता आल्या. यासह आरसीबीने हा सामना पाच धावांनी जिंकला.
बंगळुरूने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. सलामीला आलेल्या यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज यांच्यात 27 धावांची भागीदारी झाली. ही भागिदारी श्रेयंका पाटीलने मोडली. मॅथ्यूज 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली यानंतर यास्तिका भाटिया 19 धावा करून बाद झाली. नेट सिव्हर ब्रंट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तिने यास्तिका भाटियासोबत तिसऱ्या विकेटसाठी 23 धावांची भागीदारी केली.
चौथ्या विकेटसाठी हमरनप्रीत कौर आणि अमेलिया कार यांच्यात जबरदस्त भागीदारी झाली श्रेयंका पाटीलने संपवली. दोघांमध्ये 44 चेंडूत 52 धावांची भागीदारी झाली. हरमनप्रीतने आपल्या खेळीत 33 धावा केल्या. यानंतर सजीवन सजनाने एक आणि पूजाने चार धावा केल्या. त्याचवेळी, अमेलिया 27 धावा करून तर अमनजोत कौर एक धावांवर नाबाद राहिली. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने दोन तर एलिस पेरी, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

LET’S. FINISH. THE. STORY. ❤‍🔥#PlayBold #SheIsBold #ನಮ್ಮRCB #WPL2024 #MIvRCB pic.twitter.com/Riyhbe6bqH
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 15, 2024

हेही वाचा :

बोरीवली-ठाणे बोगदा म्हणजे पैसे खाण्याचे कुरण : जितेंद्र आव्हाड
Navneet Rana : नवनीत राणांच्या उमेदवारीबाबत लवकरच मोठा निर्णय: आमदार रवी राणा
१२ आमदार शिवसेना ठाकरे गटात येण्यास इच्छूक; ॲड. असीम सरोदे यांचा खळबळजनक दावा

The post मुंबईला पराभूत करून बंगळूरु फायनलमध्ये appeared first on Bharat Live News Media.