माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला अटक! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Delhi Liquor Policy Scam : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मोठी कारवाई केली. वास्तविक ईडीने बीआरएस पक्षाचे नेते आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. सी राव यांची कन्या के कविता यांना ताब्यात घेतले आहे. ईडीचे पथक के कविता यांना अटक करून हैद्राबादहून दिल्लीला आणत असल्याचे समोर आले आहे.
CAA vs US : ‘सीएएवरून अमेरिकेने भारताला ज्ञान पाजळू नये’, मोदी सरकारचे चोख प्रत्युत्तर
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.ईडीने 21 फेब्रुवारी रोजी के कविता यांना समन्स बजावून 26 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर ईडीने कारवाई करत कविता यांच्या हैदराबाद येथील घरावर छापा टाकला. यादरम्यान, काही तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर कविता यांना ताब्यात घेतले.
BRS MLC K Kavitha has been arrested by the Enforcement Directorate (ED).
(file pic) pic.twitter.com/XfAuewcmyz
— ANI (@ANI) March 15, 2024
के. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत. दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान के. कविता यांचे नाव घेतले होते. त्यानंतर कविता ईडीच्या रडारवर आल्या. ईडीने आरोप केला आहे की ‘साउथ ग्रुप’ नावाच्या लिकर लॉबीनं आणखी एक आरोपी विजय नायर यांच्यामार्फत ‘आप’ नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिली होती.
आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह हे दिल्ली मद्य धोरण प्रकरणी आधीच तुरुंगात आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही उत्पादन शुल्क धोरणाबाबत ईडी सातत्याने समन्स पाठवत आहे. मात्र, ईडीकडून समन्स आल्यानंतरही सीएम केजरीवाल एकदाही चौकशीसाठी गेलेले नाहीत. त्यांनी ईडीचे समन्स बनावट आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.
The post माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला अटक! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई appeared first on Bharat Live News Media.