मुंबईतील बंद गिरण्या पूर्ववत सुरू करणार : पियुष गोयल

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील बंद गिरण्या प्रत्येक युनिट निहाय आर्थिक सक्षमता पाहून लवकरच पूर्ववत चालू केल्या जातील, असे आश्वासन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज (दि.१५) येथे दिले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या प्रस्तावाचा उल्लेख करून ते म्हणाले की, एनटीसी गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्बांधणीचा प्रश्नही लवकरच निकालात काढला जाईल. मुंबईसह … The post मुंबईतील बंद गिरण्या पूर्ववत सुरू करणार : पियुष गोयल appeared first on पुढारी.

मुंबईतील बंद गिरण्या पूर्ववत सुरू करणार : पियुष गोयल

मुंबई: Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईतील बंद गिरण्या प्रत्येक युनिट निहाय आर्थिक सक्षमता पाहून लवकरच पूर्ववत चालू केल्या जातील, असे आश्वासन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज (दि.१५) येथे दिले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या प्रस्तावाचा उल्लेख करून ते म्हणाले की, एनटीसी गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्बांधणीचा प्रश्नही लवकरच निकालात काढला जाईल.
मुंबईसह देशभरात एनटीसीच्या बंद २३ गिरण्यांमधील कोविड काळातील उर्वरित ५० टक्के पगार व देणी आदींच्या धनादेशाचे वाटप सह्याद्री अतिथी गृहात पार पडले. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर, आमदार काळीदास कोळंबकर, रामिम संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, दिल्ली एनटीसी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता वर्मा उपस्थित होत्या. मुंबई-महाराष्ट्रासह देशभरातील बंद २३ एनटीसी गिरण्यांतील कामगार उपस्थित होते. कोविड काळात कामगारांनी सहकार्य केलेल्या कामाची गोयल यांनी प्रशंसा केली.
सचिन अहिर म्हणाले की, एनटीसी गिरण्यांच्या जमिनी विकून आलेल्या ‘टीडीआर’पोटीची रक्कम गिरण्या पूर्ववत चालू करण्यासाठी वापरावी, असा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला होता. मुंबईतील ५० वर्षापेक्षा अधिक काळ धोकादायक एनटीसी गिरण्यांच्या चाळींची पुनर्बांधणी त्वरित व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार कालिदास कोळंबकर यांनीही गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न उचलून धरला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी एनटीसी‌ गिरण्या पूर्ववत चालविण्याच्या घोषणेचे स्वागत केले. कार्यक्रमाला खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, सुनिल बोरकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा 

Piyush Goyal: मुक्त व्यापार करारासंदर्भातील चर्चेसाठी पियुष गोयल ब्रिटनचा दौरा करणार
नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा : मुख्यमंत्र्यांचे पियुष गोयल यांना पत्र
पियुष गोयल : ‘मोदी सरकारच्या धोरणांनी देशाची आर्थिक, गुंतवणूक क्षेत्रात दमदार कामगिरी’

Latest Marathi News मुंबईतील बंद गिरण्या पूर्ववत सुरू करणार : पियुष गोयल Brought to You By : Bharat Live News Media.