शरद पवारांचा फोटो वापरण्यास बंदी: अजित पवार म्हणाले, त्यांच्या…

बारामती : पुढारी वृत्तसेवा : हयात व्यक्तीचा फोटो वापरण्याचा अधिकार त्यांच्या संमतीनेच असतो, याबद्दल दुमत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सर्वोच्य न्यायालयाने शरद पवार यांचा फोटो वापरण्याबाबत अजित पवार गटाला बंदी घातल्याच्या निर्णयावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. Ajit Pawar On Sharad Pawar पवार म्हणाले, आम्ही वेगळी भूमिका घेतल्यावर समोरुन त्यांनी माझा फोटो वापरल्यास ‘ॲक्शन’ घेऊ … The post शरद पवारांचा फोटो वापरण्यास बंदी: अजित पवार म्हणाले, त्यांच्या… appeared first on पुढारी.

शरद पवारांचा फोटो वापरण्यास बंदी: अजित पवार म्हणाले, त्यांच्या…

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : हयात व्यक्तीचा फोटो वापरण्याचा अधिकार त्यांच्या संमतीनेच असतो, याबद्दल दुमत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सर्वोच्य न्यायालयाने शरद पवार यांचा फोटो वापरण्याबाबत अजित पवार गटाला बंदी घातल्याच्या निर्णयावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. Ajit Pawar On Sharad Pawar
पवार म्हणाले, आम्ही वेगळी भूमिका घेतल्यावर समोरुन त्यांनी माझा फोटो वापरल्यास ‘ॲक्शन’ घेऊ असे सांगितल्यानंतर आम्ही त्यांचा फोटो वापरणे बंद केले. नुकत्याच बारामतीत झालेल्या मेळाव्यात देखील त्यांचा फोटो वापरला नाही. कोणी वापरला असेल तर माहिती नाही. सुपे (ता. बारामती) येथे अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. Ajit Pawar On Sharad Pawar
हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेचा शब्द मागितला आहे, या प्रश्नावर पवार म्हणाले, हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते आहेत. त्यांना नुकतेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी फेडरेशनच्या चेअरमनची जबाबदारी दिली आहे. माझे आणि पाटील यांचे फोनवर बोलणे झाले आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याबरोबर बैठक घेणार आहे. महायुतीमध्ये कोणाला त्रास होवु नये, कोणी दुखावला जाणार नाही यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोणाला काही सांगायचे असल्यास त्यांनी त्यांच्या पक्षप्रमुखांना सांगावे. महायुतीच्या मित्रपक्षांची चंद्रकांत पाटील यांनी पुणे, बारामती, शिरुरमध्ये बैठका घेण्यास पुढाकार घेतला आहे. मित्रपक्षांच्या बैठकीस सुरवात केली आहे. ते सर्वांशी बोलत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा 

Sharad Pawar vs Ajit Pawar | अजित पवारांना धक्का! ‘घड्याळ’ चिन्ह बदलणार, प्रचाराच्या पोस्टर्समध्ये शरद पवारांचा फोटोही वापरण्यास मनाई
शरद पवारांच्या संपर्क मोहीमेला उद्या बारामतीत अजित पवारांकडून उत्तर

 Vasant More : वसंत मोरे यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News शरद पवारांचा फोटो वापरण्यास बंदी: अजित पवार म्हणाले, त्यांच्या… Brought to You By : Bharat Live News Media.