भाजप सरकारमुळे अर्थव्यवस्थेची दुर्दशा : राहुल गांधी
जयपूर; वृत्तसंस्था : राजस्थानच्या धौलपूरमधील राजखेडा, भरतपूरमधील नादबाई आणि गंगापूर शहरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचार सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर चौफेर टीका त्यांनी केले. या तिघांनी मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
माझ्यासाठी भारतमाता म्हणजे भारतातील गरीब, दलित, आदिवासी, मागासवर्गीय लोक, छोटे दुकानदार हेच आहेत. राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा, माजी केंद्रीय मंत्री भंवर जितेंद्र सिंह आणि राजस्थानचे पर्यटनमंत्री विश्वेंद्र सिंह यावेळी उपस्थित होते. राजस्थानमध्ये आमचे सरकार आल्यास पहिले काम म्हणून जात जनगणना केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
निवडणूक आयोगाकडे तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वचषक अंतिम सामन्याला हजर राहिल्यामुळेच भारताचा पराभव झाला, या राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे बुधवारी तक्रार दाखल केली.
The post भाजप सरकारमुळे अर्थव्यवस्थेची दुर्दशा : राहुल गांधी appeared first on पुढारी.
जयपूर; वृत्तसंस्था : राजस्थानच्या धौलपूरमधील राजखेडा, भरतपूरमधील नादबाई आणि गंगापूर शहरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचार सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर चौफेर टीका त्यांनी केले. या तिघांनी मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केल्याचेही राहुल गांधी म्हणाले. माझ्यासाठी भारतमाता म्हणजे भारतातील गरीब, दलित, आदिवासी, मागासवर्गीय लोक, …
The post भाजप सरकारमुळे अर्थव्यवस्थेची दुर्दशा : राहुल गांधी appeared first on पुढारी.