किरकटवाडीत फुलली अफूची शेती; दोघांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत बेकायदा अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने उजेडात आणला आहे. पोलिसांच्या पथकाने छापा टाकून 14 किलो अफूची बोंडे जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तानाजी शांताराम हगवणे (वय 48), शिवाजी बबन हगवणे (वय 55, दोघे रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्यांची … The post किरकटवाडीत फुलली अफूची शेती; दोघांना अटक appeared first on पुढारी.

किरकटवाडीत फुलली अफूची शेती; दोघांना अटक

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत बेकायदा अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने उजेडात आणला आहे. पोलिसांच्या पथकाने छापा टाकून 14 किलो अफूची बोंडे जप्त केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तानाजी शांताराम हगवणे (वय 48), शिवाजी बबन हगवणे (वय 55, दोघे रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किरकटवाडीतील नांदोशी रस्त्यावर इंद्रप्रस्थ सोसायटीजवळ आरोपी हगवणे यांची शेती आहे. शेतात बेकायदा अफूची लागवड केल्याची माहिती ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा आणि हवेली पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. हगवणे यांनी शेतात अफूची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने 14 किलो अफूची बोंडे जप्त केली. जप्त केलेल्या अफूच्या बोडांची किंमत 28 हजार 700 रुपये आहे.
दोघांविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक राहुल वांगडे, विकास अडागळे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, दत्ता तांबे, दगडू विरकर, दिलीप आंबेकर, अशोक तारू यांनी ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे, अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागात अफू लागवड करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिले होते. सासवड परिसरातील कोडीत गावात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड केल्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला होता. या कारवाईत पोलिसांनी दहा किलो 500 ग्रॅम वजनाची अफूची बोंडे जप्त केली होती.
हेही वाचा

अजब कारभार ! मंजुरीपूर्वीच हॉस्पिटलचे भूमिपूजन
हिंगोली : मिनी बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱ्याची २ लाखाची फसवणूक
Pratibha Patil | देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल, पुण्यात उपचार

Latest Marathi News किरकटवाडीत फुलली अफूची शेती; दोघांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.