काँग्रेसला पुन्हा धक्का; पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी भाजपच्या वाटेवर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एका मागून एक धक्के बसत आहेत. तर भाजपची ताकद आणखी वाढताना दिसत आहे. दरम्यान काँग्रेसच्या निलंबित खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर या आज (दि.१४) दिल्लीत औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. असे वृत्त ‘ANI’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Lok Sabha Election)
Preneet Kaur, suspended Congress MP and wife of former Punjab Chief Minister Amarinder Singh, will formally join the BJP in Delhi, today.
(File pic) pic.twitter.com/2RUOfbMTGw
— ANI (@ANI) March 14, 2024
2023 मध्ये काँग्रेसमधून निलंबित
८० वर्षीय प्रनीत यांचे वय निवडणुकांच्या विरोधात जात असले तरी, पटियाला जागेसाठी त्या भाजपच्या आघाडीच्या उमेदवार आहेत. पक्षविरोधी कारवायांमुळे प्रनीत यांना गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. त्या पहिल्यांदा 1999 मध्ये लोकसभेसाठी निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१९ मध्ये पुन्हा निवडून आल्या. २०१४ मध्ये, त्यांचे पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्याऐवजी लोकसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान देशात मोदी लाट असूनही अमृतसर संसदीय जागेवरून राज्यसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते दिवंगत अरुण जेटली यांचा पराभव करत ते निवडून आले होते. २०१४ ते २०१७ दरम्यान त्या आमदार होत्या. २००९ ते ऑक्टोबर २०१२ या काळात त्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए-२ सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री देखील होत्या.
The post काँग्रेसला पुन्हा धक्का; पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी भाजपच्या वाटेवर appeared first on Bharat Live News Media.
