दिवाळी हंगामात एसटीच्या वर्धा विभागाला 3 कोटी 15 लाखाचे उत्पन्न
वर्धा; पुढारी वृत्तसेवा : प्रवासी सेवेमध्ये अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाने दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली होती. त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या दरम्यान 3 कोटी 15 लाखाचे उत्पन्न महामंडळास मिळाले.
दिवाळीनिमित्त 10 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत वर्धा येथून पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथे येणारे व जाणारे प्रवासी तसेच इतर जिल्ह्यात, तालुक्यात व ग्रामीण भागात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. या कालावधीत या अतिरिक्त फेऱ्यांद्वारे 8 लाख 97 हजार 232 किमी वाहन चालवून तब्बल 3 कोटी 15 लाख 6 हजार इतके भरघोस उत्पन्न प्राप्त केले.
याव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळातर्फे देण्यात येणाऱ्या सवलतीमध्ये महिला सन्मान योजनेंतर्गत 50 टक्के सवलतीत 5 लाख 30 हजार 721 महिलांनी प्रवास केला. त्यामधून 4 कोटी 33 लाख 9 हजार, अमृत जेष्ठ नागरिक 100 टक्के सवलत योजनेंतर्गत 1 लाख 54 हजार 320 जेष्ठ नागरिकांनी प्रवास केला. त्यामधून 72 लाख 15 हजार व जेष्ठ नागरिक 50 टक्के सवलत या योजनेंतर्गत 69 हजार 372 जेष्ठ नागरिकांनी प्रवास केला असून त्यामधून 18 लाख 64 हजार उत्पन्न प्राप्त झाले.
The post दिवाळी हंगामात एसटीच्या वर्धा विभागाला 3 कोटी 15 लाखाचे उत्पन्न appeared first on पुढारी.
वर्धा; पुढारी वृत्तसेवा : प्रवासी सेवेमध्ये अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाने दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली होती. त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या दरम्यान 3 कोटी 15 लाखाचे उत्पन्न महामंडळास मिळाले. दिवाळीनिमित्त 10 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत वर्धा येथून पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथे येणारे व …
The post दिवाळी हंगामात एसटीच्या वर्धा विभागाला 3 कोटी 15 लाखाचे उत्पन्न appeared first on पुढारी.