आनंदराज आंबेडकर यांना खासदार बनवून अमरावती मॉडेल राज्यभर पोचविणार

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : कार्यकर्त्यांना जी पद मिळाली ती पद आनंदाने स्वीकारून त्या पदाला न्याय द्यावा, पदामुळे माणूस मोठा होत नाही तर तो त्याच्या कामामुळे होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना जिल्ह्याचे खासदार बनवून अमरावती मॉडेल राज्यभर पोहोचविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रदेश महासचिव तथा अमरावती लोकसभा निरीक्षक … The post आनंदराज आंबेडकर यांना खासदार बनवून अमरावती मॉडेल राज्यभर पोचविणार appeared first on पुढारी.
#image_title

आनंदराज आंबेडकर यांना खासदार बनवून अमरावती मॉडेल राज्यभर पोचविणार

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : कार्यकर्त्यांना जी पद मिळाली ती पद आनंदाने स्वीकारून त्या पदाला न्याय द्यावा, पदामुळे माणूस मोठा होत नाही तर तो त्याच्या कामामुळे होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना जिल्ह्याचे खासदार बनवून अमरावती मॉडेल राज्यभर पोहोचविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रदेश महासचिव तथा अमरावती लोकसभा निरीक्षक श्रीपती ढोले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील रिपब्लिकन सेनेची कार्यकारणी सर्वच आघाड्या आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने बरखास्त करण्यात आल्या होत्या. शासकीय विश्रामगृह येथे नूतन कार्यकारणीची निवड सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने करण्यात आली. रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा अमरावती लोकसभा निरिक्षक श्रीपती ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकारी पदाधिकाऱ्यांचे निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विनायकराव दुधे,विदर्भ प्रदेश महासचिव प्रा. सतीश सियाले, जिल्हाध्यक्ष अनिल बरडे, जिल्हा महासचिव एडवोकेट धर्मेंद्र आठवले, बाळासाहेब वाकोडे,पत्रकार नयन मोंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

महत्वपूर्ण बैठकीचे प्रस्ताविक अनिल बरडे यांनी केले. संचालन एडवोकेट धर्मेंद्र आठवले तर आभार सचिन तेलमोरे यांनी मानले. बैठकीला मुकुल परगणे, आम्रपाली वरघट, माजी जिल्हा परिषद सदस्य शोभा सियाले, माजी नगरसेवक साहेबराव मेश्राम, विठ्ठल तंतरपाडे, गौतम प्रधान, अशोक वासनिक, किशोर पानेकर, वैशाली काळे, अनुराग धावणे, अरविंद नगराळे, बी एन खोब्रागडे, सी एस वानखडे, अनिल कडू, विजय मनोहर, गोपाल ढेकेकर, परमानंद खिराडे, संगम मेश्राम, सत्यशील डोंगरे, श्रीधर खडसे, प्रा त्र्यंबक सदार, धनराज मेश्राम, एस एन खंडारे, विजय मोरे, सागर घोडेस्वार, रामेश्वर रामटेके, ताराचंद चोरपगार, अनिल इंगळे, देविदास दांडगे, अमोल पवार, सरिता खंडारे, नीता डाखोडे, गजानन लबडे, बाबूजी खंडेकर, प्रफुल्ल वाकोडे, नागोराव भटकर, राहुल वर्धे, धनराज शेंडे, विजय गवई, शैलेश गवई, रामेश्वर वानखडे, सुंदरलाल उईके, बाबुराव इंगोले यांच्यासह जिल्हाभरातील रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
अनिल बरडे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने पुन्हा निवड
रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा अमरावती लोकसभा निरीक्षक श्रीपती ढोले यांनी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल बरडे यांच्या नावाची उपस्थित एकमताने घोषणा केली. तर अमरावती महानगराध्यक्षपदी किशोर पानेकर, महासचिव माजी नगरसेवक साहेबराव मेश्राम, जिल्हा महासचिवपदी एडवोकेट धर्मेंद्र आठवले, अमरावती तालुकाध्यक्ष अनिल कडू, दर्यापूर तालुकाअध्यक्ष सत्यशील डोंगरे, दर्यापूर विधानसभा अध्यक्ष शैलेश गवई, अचलपूर तालुकाध्यक्ष रामेश्वर वानखडे, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष त्रबक सदार, अमरावती शहर उपाध्यक्ष बाळासाहेब वाकोडे, श्रीधर खडसे यांच्यासह जिल्ह्यातील १४ ही तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
आनंदराज आंबेडकर राजकीय पोकळी भरून काढणार-प्रा सतीश शियाले
अमरावती जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीची राजकीय पोकळी भरून काढण्याकरिता आनंदराज आंबेडकर जिल्ह्याचे खासदार होणे आवश्यक आहे. आंबेडकरी चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना केवळ रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आनंदराज आंबेडकर न्याय मिळवून देणार आहेत १९९८ नंतर समाजाचा एकही खासदार निवडून आला नाही तीच राजकीय पोकळी भरून काढून नवीन राजकीय वळण देण्याची जबाबदारी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यावर असून आनंदराज आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी सज्ज होण्याचे आवाहन विभागीय महासचिव प्रा. सतीश शियाले यांनी केले.

पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून पक्ष संघटन बांधण्यासाठी सज्ज व्हावे. ज्या पदाधिकाऱ्यांना संघटन बांधणीचं ओझं पेलत नसेल त्यांनी आपल्या वार्डात व प्रभागातच जोमाने कार्य करावे, पद घेऊन त्या पदाला न्याय न देता गोठवून ठेवू नका. लोकसभेत आनंदराज आंबेडकर यांना पाठविण्यासाठी बूथ स्तरावर पक्ष मजबूत करावा. आनंदराज आंबेडकर जिल्ह्याचे खासदार होतीलच तर जिल्ह्यातून रिपब्लिकन सेनेचे दोन आमदार निवडून आणणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अनिल बरडे यांनी यावेळी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या जिल्ह्याचे खासदार व्हावे याकरिता जिल्ह्यातील समविचारी राजकीय पक्ष व सामाजिक संघटना रिपब्लिकन सेनेला सर्वतोपरी सहकार्य करणार आहेत. जिल्ह्यात ‘आंबेडकरांचा वारसदार बनवूया खासदार’ हे ब्रीदवाक्य घेऊन रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन बांधणी करिता जोमाने कामाला लागण्याचे आवाहन बैठकीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनायक दुधे यांनी केले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा झाला सत्कार
रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सरचिटणीस श्रीपती ढोले यांची लोकसभा निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच अनिल बरडे यांची पुन्हा जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्याबद्दल, नवनियुक्त सर्वच पदाधिकारींचे शाल पुष्पगुच्छ देऊन उपस्थित कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
The post आनंदराज आंबेडकर यांना खासदार बनवून अमरावती मॉडेल राज्यभर पोचविणार appeared first on पुढारी.

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : कार्यकर्त्यांना जी पद मिळाली ती पद आनंदाने स्वीकारून त्या पदाला न्याय द्यावा, पदामुळे माणूस मोठा होत नाही तर तो त्याच्या कामामुळे होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना जिल्ह्याचे खासदार बनवून अमरावती मॉडेल राज्यभर पोहोचविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रदेश महासचिव तथा अमरावती लोकसभा निरीक्षक …

The post आनंदराज आंबेडकर यांना खासदार बनवून अमरावती मॉडेल राज्यभर पोचविणार appeared first on पुढारी.

Go to Source