नागपूरमधील बायोडायव्हर्सिटी पार्कला आज पुन्हा आग

नागपूर;पुढारी वृत्तसेवा: हिंगणा परिसरात असलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्क मधील जंगलाला आज (दि.१३) पुन्हा दुसऱ्या दिवशी दुपारी आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी वेळीच धाव घेत ही आग आटोक्यात आणली. पूर्णतः नियंत्रण मिळाल्याशिवाय नुकसानीचा अंदाज घेत येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. (Nagpur Fire News) आगीचे लोळ व धूर दिसत असल्याने पूजा कुकडीकर यांनी एमआयडीसी फायर स्टेशनला … The post नागपूरमधील बायोडायव्हर्सिटी पार्कला आज पुन्हा आग appeared first on पुढारी.

नागपूरमधील बायोडायव्हर्सिटी पार्कला आज पुन्हा आग

नागपूर;Bharat Live News Media वृत्तसेवा: हिंगणा परिसरात असलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्क मधील जंगलाला आज (दि.१३) पुन्हा दुसऱ्या दिवशी दुपारी आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी वेळीच धाव घेत ही आग आटोक्यात आणली. पूर्णतः नियंत्रण मिळाल्याशिवाय नुकसानीचा अंदाज घेत येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. (Nagpur Fire News)
आगीचे लोळ व धूर दिसत असल्याने पूजा कुकडीकर यांनी एमआयडीसी फायर स्टेशनला बायोडायव्हर्सिटी पार्कला आग लागल्याची माहिती दिली. यानंतर तातडीने त्रिमूर्ती नगर, सुगत नगर, सिव्हिल लाईन्स मुख्यालय, नरेंद्र नगर येथून चार अग्निशमन वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. यासोबतच एमआयडीसी फायर स्टेशन व वाडी फायर स्टेशनचे अग्निशमन जवान तातडीने आगीवर नियंत्रण करण्यासाठी पोहोचले. (Nagpur Fire News)
काल (दि.१२) व आज बुधवारी (दि.१३) अशाप्रकारे दोन दिवस सलग लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर या जंगलातील गवत व झाडे जळून खाक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, सलग दोन दिवस एकाच ठिकाणी ही आग कशामुळे लागली हे मात्र गूढ कायम आहे. नागपुरात मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच गेल्या दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढल्याने यंदा उष्माघात,आगीच्या घटना वाढण्याची चिन्हे असल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जात आहे. (Nagpur Fire News)
Latest Marathi News नागपूरमधील बायोडायव्हर्सिटी पार्कला आज पुन्हा आग Brought to You By : Bharat Live News Media.