मुख्यमंत्री शिंदेंच्या दालनातील नावाची पाटी बदलली

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला धोरणानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयाच्या नावाच्या पाटीत बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनामधील प्रवेशद्वारावरील पाटीवर आता ‘एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे’ असे नाव लिहिले आहे. या संदर्भातील माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (Eknath Shinde Name) महिला धोरणाची सुरूवात स्वत:पासून; मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री एकनाथ … The post मुख्यमंत्री शिंदेंच्या दालनातील नावाची पाटी बदलली appeared first on पुढारी.

मुख्यमंत्री शिंदेंच्या दालनातील नावाची पाटी बदलली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महिला धोरणानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयाच्या नावाच्या पाटीत बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनामधील प्रवेशद्वारावरील पाटीवर आता ‘एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे’ असे नाव लिहिले आहे. या संदर्भातील माहिती स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (Eknath Shinde Name)
महिला धोरणाची सुरूवात स्वत:पासून; मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुलांना जन्म देण्यापासून त्यांना मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचादेखील तेवढाच वाटा असतो. तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी प्रत्येक व्यक्तीने शासकीय दस्तऐवजावर यापुढे वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला होता. याची सुरुवात मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःपासून करायची असे ठरवले होते. त्यानुसार माझ्या मंत्रालयातील दालनावरची पाटी आता बदलण्यात आलेली आहे” (Eknath Shinde Name)

एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे…!
मुलांना जन्म देण्यापासून त्यांना मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांचा बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो. तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी प्रत्येक व्यक्तीने शासकीय दस्तऐवजावर यापुढे वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक… pic.twitter.com/EbCJqmvUn9
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 13, 2024

अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर करण्यात आले. याबाबतची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X वर पोस्ट करत दिली होती. ”आंतरराष्ट्रीय महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण लागू करण्यात येतं आहे. लेक लाडकी योजना, महिला सशक्तीकरण अभियान, मनोधैर्य योजना, महिला सक्षमीकरण केंद्र अशा विविध योजनांतून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व सक्षमीकरणासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त करूया.” असे तटकरे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस या धोरणातून करण्यात आली आहे. (International Women’s Day 2024) तसेच यापुढे अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणं बंधनकारक करण्यात आल्याचे या धोरणात स्पष्ट करण्यात आले होते.
हेही वाचा:

Ajit Pawar : आता वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लागणार : अजित पवार
International Women’s Day 2024 | अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक, राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर

Latest Marathi News मुख्यमंत्री शिंदेंच्या दालनातील नावाची पाटी बदलली Brought to You By : Bharat Live News Media.