
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (दि.१३ मार्च) ‘नारी न्याय गॅरंटी’ची घोषणा केली. या याेजनेच्या माध्यमातून सत्तेत आल्यास काँग्रेस पक्ष महिलांसाठी पाच विशेष याेजना राबविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
खर्गे म्हणाले की, काँग्रेस आज ‘नारी न्याय गॅरंटी’ ( महिला न्याय हमी) घोषणा जाहीर करत आहे. केंद्रात सत्तेत आल्यास या योजने अंतर्गत काँग्रेस पक्ष देशातील महिलांसाठी एक नवा अजेंडा ठरवणार आहे. यामध्ये महालक्ष्मी हमी योजने अंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला प्रतिवर्ष १ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच लोकसंख्या पूर्ण हक्क या योजनेनुसार केंद्र सरकारच्या स्तरावर होणाऱ्या नव्या भरतींमध्ये निम्म्याहून अधिक अधिकार महिलांना असतील. शक्ती का सन्मान या योजने अंतर्गत अंगणवाडी, आशा आणि मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात केंद्र सरकारचे योगदान दुप्पट केले जाईल. अधिकार मैत्री या अंतर्गत महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांचे हक्क आणि कायदेशीर मदतीसाठी प्रत्येक पंचायतीमध्ये कायदे सल्लागार नियुक्ती केली जाईल. तसेच सावित्रीबाई फुले वसतिगृहांची संख्या देशभरात दुप्पट केली जाईल.
#WATCH | Delhi | Congress national president Mallikarjun Kharge says, “Congress is announcing ‘Nari Nyay Guarantee’ today. Under this, the party is going to set a new agenda for women in the country. Under ‘Nari Nyay Guarantee’, Congress is making 5 announcements. First,… pic.twitter.com/vXFHqJINue
— ANI (@ANI) March 13, 2024
The post काँग्रेसची महिलांना ‘साथ’, ‘नारी न्याय गॅरंटी’ची घाेषणा appeared first on Bharat Live News Media.
