नेलपॉलिश काचेच्या बाटलीतच का ?

मेक्सिको : नेलपॉलिश कितीही ब्रँडेड असो किंवा कितीही साधी. पण, ती नेहमी काचेच्या बाटलीतच येते. हल्ली प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग अशी नेलपॉलिश लावण्याचा ट्रेंड आला आहे. शिवाय नेलआर्टचा ट्रेंड देखील आहे. ज्यामध्ये नेल एक्टेंशन शिवाय वेगवेगळ्या डिझाईन आणि रंगाची नेलपॉलिश लावली जाते. पण नेलपॉलिश फक्त काचेच्या बाटलीतच का येते, हे रंजक आहे. यामागील मुख्य कारण आहे, … The post नेलपॉलिश काचेच्या बाटलीतच का ? appeared first on पुढारी.

नेलपॉलिश काचेच्या बाटलीतच का ?

मेक्सिको : नेलपॉलिश कितीही ब्रँडेड असो किंवा कितीही साधी. पण, ती नेहमी काचेच्या बाटलीतच येते. हल्ली प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग अशी नेलपॉलिश लावण्याचा ट्रेंड आला आहे. शिवाय नेलआर्टचा ट्रेंड देखील आहे. ज्यामध्ये नेल एक्टेंशन शिवाय वेगवेगळ्या डिझाईन आणि रंगाची नेलपॉलिश लावली जाते. पण नेलपॉलिश फक्त काचेच्या बाटलीतच का येते, हे रंजक आहे.
यामागील मुख्य कारण आहे, काचेचा गुणधर्म. नेलपॉलिशमध्ये असलेल्या रसायनाशी काचेची रिअ‍ॅक्शन होत नाही आणि त्यामुळे नेलपॉलिशचा दर्जा आणि मूलभूत घटक आहे तसेच राहतात. एवढेच नाही तर काचेमुळे नेलपॉलिश लवकर सुकत नाही. यामुळे ती अनेक दिवस आपण वापरू शकतो. यामागील आणखी एक कारण आहे, ते म्हणजे रंग निवडण्यात होणारी मदत. काचेच्या बाटलीमुळे रंग सत्वर ओळखता येतात. ज्यामुळे ग्राहक आपल्या पसंतीचा रंग निवडू शकतात, असे यामागील कारण असते.
Latest Marathi News नेलपॉलिश काचेच्या बाटलीतच का ? Brought to You By : Bharat Live News Media.