हिंगोली : आडगाव रंजे येथील वळण रस्‍त्‍यावर ट्रक पलटी; ड्रायव्हर जखमी

आडगाव रंजे; पुढारी वृत्तसेवा वसमत तालुक्यातील आडगाव रंजे ते हट्टा दरम्यान हिंगोली परभणी रोडवरील असलेल्या वळण रस्त्यावर आज (बुधवार) एका ट्रकचा अपघात झाला. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास अमरावतीहून कापसाचे गठान घेऊन परभणीकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 27 एक्स 8755 हा आडगाव रंजे येथून जवळच असलेल्या वळणावरील अरुंद पुलाच्या दुभाजकाला धडकला. अपघात इतका भीषण होता … The post हिंगोली : आडगाव रंजे येथील वळण रस्‍त्‍यावर ट्रक पलटी; ड्रायव्हर जखमी appeared first on पुढारी.

हिंगोली : आडगाव रंजे येथील वळण रस्‍त्‍यावर ट्रक पलटी; ड्रायव्हर जखमी

आडगाव रंजे; Bharat Live News Media वृत्तसेवा वसमत तालुक्यातील आडगाव रंजे ते हट्टा दरम्यान हिंगोली परभणी रोडवरील असलेल्या वळण रस्त्यावर आज (बुधवार) एका ट्रकचा अपघात झाला. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास अमरावतीहून कापसाचे गठान घेऊन परभणीकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 27 एक्स 8755 हा आडगाव रंजे येथून जवळच असलेल्या वळणावरील अरुंद पुलाच्या दुभाजकाला धडकला. अपघात इतका भीषण होता की पुलाच्या एका बाजूचे सिमेंटचे असलेले संपूर्ण कठडे तोडून ट्रक ओढ्यात जाऊन पडला. यामध्ये ड्रायव्हर व क्लीनर दोघे जखमी झाले आहेत.
ह्या अपघाताची माहिती मिळताच आत्ता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन बोराटे बिट जमादार कावरखे, धोत्रे हे घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी तुटलेल्या पुलाच्या बाजूला बॅरिकेट्स आणून लावले.
दरम्यान हा पूल अरुंद असल्यामुळे या पुलावर वारंवार छोटे मोठे अपघात घडत असतात. तसेच या पुलावर कुठलेही दिशादर्शक फलक नाहीत. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमुळेही समोरचे काहीही दिसत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
Latest Marathi News हिंगोली : आडगाव रंजे येथील वळण रस्‍त्‍यावर ट्रक पलटी; ड्रायव्हर जखमी Brought to You By : Bharat Live News Media.