धुळे: शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक गजाआड
धुळे, पुढारी वृत्तसेवा : शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यावरून प्रतिबंधात्मक कारवाई तसेच अटक टाळण्यासाठी १५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकास धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
तक्रारदार हे शिरपूर शहरातील रहिवासी असून त्यांच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क केला असता त्यांना पोलीस नाईक लक्ष्मीकांत टाकणे यांनी ही कारवाई टाळणे तसेच अटक न करण्यासाठी १ हजार ५०० रूपयांची लाच मागितली.
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे सदर तक्रारदाराने धुळे येथे येऊन उपअधीक्षक अभिषेक पाटील यांची भेट घेऊन या घटनेची माहिती दिली. यावरून पाटील यांनी शिरपूर येथे या तक्रारीची पडताळणी केली. यानंतर उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर अहिरे, जगदीश बडगुजर, मकरंद पाटील, आदी पथकाच्या मदतीने सापळा लावला. यावेळी पोलीस नाईक लक्ष्मीकांत टाकणे यांनी ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडून १५०० रुपये स्वीकारताच त्यांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. या संदर्भात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा
धुळे : रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता
धुळे : ज्ञान देणारे नसतील तर ऐश्वर्य आणि वैभव निरुपयोगी : पंडित प्रदीप मिश्रा
धुळे : राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून हेलिपॅडची पाहणी
The post धुळे: शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक गजाआड appeared first on पुढारी.
धुळे, पुढारी वृत्तसेवा : शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यावरून प्रतिबंधात्मक कारवाई तसेच अटक टाळण्यासाठी १५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस नाईकास धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. तक्रारदार हे शिरपूर शहरातील रहिवासी असून त्यांच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात …
The post धुळे: शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक गजाआड appeared first on पुढारी.