कोल्हापूर : शाहुवाडी’त आढळल्या ९ हजार ६५४ कुणबी नोंदी

विशाळगड : शाहुवाडी तहसील कार्यालयाकडुन कुणबीच्या जुन्या नोंदी शोधण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. सहा सर्कल विभागासह प्रा वसंत सिंघन, अमर पाटील, श्रीधर पाटील या तीन मोडीवाचकांच्या सहकार्याने हे काम सुरू आहे. आजअखेर १ लाख ४० हजार २७३ विविध अभिलेखाच्या नोंदी तपासण्यात आल्या असून आजअखेर ९ हजार ६५४ कुणबीच्या नोंदी सापडल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी … The post कोल्हापूर : शाहुवाडी’त आढळल्या ९ हजार ६५४ कुणबी नोंदी appeared first on पुढारी.
#image_title
कोल्हापूर : शाहुवाडी’त आढळल्या ९ हजार ६५४ कुणबी नोंदी

सुभाष पाटील

विशाळगड : शाहुवाडी तहसील कार्यालयाकडुन कुणबीच्या जुन्या नोंदी शोधण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. सहा सर्कल विभागासह प्रा वसंत सिंघन, अमर पाटील, श्रीधर पाटील या तीन मोडीवाचकांच्या सहकार्याने हे काम सुरू आहे. आजअखेर १ लाख ४० हजार २७३ विविध अभिलेखाच्या नोंदी तपासण्यात आल्या असून आजअखेर ९ हजार ६५४ कुणबीच्या नोंदी सापडल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली.
तालुक्यात ४८ हजार ९७५ महसुली अभिलेखाच्या, भूमिअभिलेख विभागाकडील १७५२ नोंदी तपासल्या असता त्यामध्ये एकही कुणबी जातीच्या नोंदी आढळलेल्या नाहीत. जन्म-मृत्यूच्या तपासलेल्या २६ हजार ५७० नोंदीमध्ये ९ हजार १२२ कुणबीच्या नोंदी आढळल्या. शैक्षणिक अभिलेखाच्या ६२ हजार ७७६ तपासलेल्या नोंदीमध्ये ५३२ नोंदी कुणबी आढळल्या आहेत. अशा एकूण आजअखेर १ लाख ४० हजार २७३ विविध अभिलेखाच्या नोंदी तपासण्यात आल्या असून त्यामध्ये ९ हजार ६५४ कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत. तालुक्यात नोंदी शोधण्याचे काम अजून सुरूच असल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली.
मोडी तज्ञ प्रा. वसंत सिंघण, अमर पाटील, श्रीधर पाटील मोडीतील नोंदी शोधण्यासाठी प्रशासनास सहकार्य करत आहेत. यावेळी निवासी तहसीलदार गणेश लवे, महसुल नायब तहसिलदार रवींद्र मोरे उपस्थित होते. ही मोहीम सरकारची पुढील सूचना येईपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत तालुका पातळीवर विविध विभागांतर्गत कुणबी नोंदीचा शोध घेतला जात आहे.

शाहुवाडीत तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील सभागृहात कुणबीच्या नोंदी शोधण्याचे काम सुरू असून आजअखेर ९ हजार ६५४ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तालुक्यात सुमारे १५ हजारांहून अधिक कुणबी नोंदी सापडण्याची शक्यता असून याचा लाभ ४० हजारांहून अधिक कुटुंबांना मिळू शकेल.
प्रा. वसंत सिंघन, मोडी तज्ञ शाहूवाडी

हेही वाचा : 

Maratha Reservation : कुणबी नोंदी संकेतस्थळावर अपलोड
करवीर तालुक्यात 11 हजार 742 कुणबी नोंदी
Pune News : सातगाव पठार भागात आढळल्या 137 कुणबी नोंदी

The post कोल्हापूर : शाहुवाडी’त आढळल्या ९ हजार ६५४ कुणबी नोंदी appeared first on पुढारी.

विशाळगड : शाहुवाडी तहसील कार्यालयाकडुन कुणबीच्या जुन्या नोंदी शोधण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. सहा सर्कल विभागासह प्रा वसंत सिंघन, अमर पाटील, श्रीधर पाटील या तीन मोडीवाचकांच्या सहकार्याने हे काम सुरू आहे. आजअखेर १ लाख ४० हजार २७३ विविध अभिलेखाच्या नोंदी तपासण्यात आल्या असून आजअखेर ९ हजार ६५४ कुणबीच्या नोंदी सापडल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी …

The post कोल्हापूर : शाहुवाडी’त आढळल्या ९ हजार ६५४ कुणबी नोंदी appeared first on पुढारी.

Go to Source