धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक १० हजारांची घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. श्रीदिप दौलतराव बागुल असे या अधिकारीचे नाव आहे. कन्नड तालुक्यातील कालीमठ फाट्यावर मंगळवारी (दि. १२) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव येथील ५३ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, कालीमठ ट्रस्ट … The post धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कन्नड; Bharat Live News Media वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक १० हजारांची घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. श्रीदिप दौलतराव बागुल असे या अधिकारीचे नाव आहे. कन्नड तालुक्यातील कालीमठ फाट्यावर मंगळवारी (दि. १२) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव येथील ५३ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, कालीमठ ट्रस्ट (उपळा) येथील देवस्थानची गुप्त दानपेटी उघडून त्यातील रक्कम ट्रस्टीच्या ताब्यात देण्यासाठी १० हजांराची मागणी संबंधित अधिकारीने केली. ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, अप्पर पोलीस अधिक्षक मुकुंद आघाव, प्रभारी पोलीस उपअधिक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांनी पोलीस हवालदार दिगंबर पाठक, भीमराज जिवडे, राजेंद्र सिनकर, चंद्रकांत शिंदे यांच्या सहकार्याने योग्यरीत्या सापळा रचून श्रीदिप बागुल यांनी १० हजार रुपये पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून १० हजार स्विकारण्याचे मान्य केले. कालीमठ फाटा येथे पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम १० हजार रुपये स्वतः स्वीकारले नंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. श्रीदिप बागुल यांनी लाच घेतल्याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Latest Marathi News धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.