इलेक्ट्रोल बाँडची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर; SCने झापल्यानंतर SBI ताळ्यावर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रोल बाँडची सर्व माहिती मुख्य निवडणूक आयुक्तालयाकडे मंगळवारी (दि. १२) सायंकाळी सादर केली आहे. ही माहिती संकलित करून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. पण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमननी यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र अजून न्यायालयात सादर केलेले नाही.
या संदर्भातील प्रतिज्ञापत्र तयार असून ते लवकरच सादर केले जाईल, असे NDTVच्या वृत्तात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी ६ मार्चपर्यंत ही माहिती सादर करण्याचे आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाला दिले होते. ही मुदतवाढ वाढवून देण्याची मागणी करणारी याचिक स्टेट बँक ऑफ इंडियाने सादर केली होती, त्यावर सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांनी स्टेट बँकची चांगलीच कानउघाडणी केली आणि ही माहिती मंगळवारीच सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने तातडीने ही माहिती मुख्य निवडणूक आयोगाला सादर केली आहे.
The post इलेक्ट्रोल बाँडची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर; SCने झापल्यानंतर SBI ताळ्यावर appeared first on Bharat Live News Media.

Home महत्वाची बातमी इलेक्ट्रोल बाँडची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर; SCने झापल्यानंतर SBI ताळ्यावर
इलेक्ट्रोल बाँडची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर; SCने झापल्यानंतर SBI ताळ्यावर
पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयाने झापल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रोल बाँडची सर्व माहिती मुख्य निवडणूक आयुक्तालयाकडे मंगळवारी (दि. १२) सायंकाळी सादर केली आहे. ही माहिती संकलित करून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. पण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमननी यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र अजून न्यायालयात सादर केलेले नाही. या …
The post इलेक्ट्रोल बाँडची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर; SCने झापल्यानंतर SBI ताळ्यावर appeared first on पुढारी.
