हरियाणाच्‍या मुख्‍यमंत्रीपदी नायब सिंग सैनी शपथबद्ध

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरियाणाच्‍या मुख्‍यमंत्रीपदी आज ( दि. १२ मार्च ) नायब सिंग सैनी शपथबद्ध झाले. त्‍यांना राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरुन आज (दि.१२मार्च) सकाळी हरियाणातील भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष युती तुटली. मुख्‍यमंत्रीपदाचा मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला. यानंतर मुख्‍यमंत्रीपदी नायब सिंग … The post हरियाणाच्‍या मुख्‍यमंत्रीपदी नायब सिंग सैनी शपथबद्ध appeared first on पुढारी.

हरियाणाच्‍या मुख्‍यमंत्रीपदी नायब सिंग सैनी शपथबद्ध

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : हरियाणाच्‍या मुख्‍यमंत्रीपदी आज ( दि. १२ मार्च ) नायब सिंग सैनी शपथबद्ध झाले. त्‍यांना राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरुन आज (दि.१२मार्च) सकाळी हरियाणातील भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष युती तुटली. मुख्‍यमंत्रीपदाचा मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला. यानंतर मुख्‍यमंत्रीपदी नायब सिंग सैनी यांची एकमताने निवड झाल्‍याचे भाजपने स्‍पष्‍ट केले हाेते.
यावेळी हरियाणाच्‍या मुख्‍यमंत्रीपदी आज ( दि. १२ मार्च ) नायब सिंग सैनी शपथबद्ध झाले.  यानंतर भाजप नेते कंवर पाल गुजर यांनी हरियाणाच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली.

Haryana BJP president Nayab Singh Saini takes oath as the Chief Minister of Haryana, at the Raj Bhavan in Chandigarh. pic.twitter.com/67tWDvnOYV
— ANI (@ANI) March 12, 2024

 नायब सिंग सैनींची राजकीय कारकीर्द
माजी मुख्‍यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे निकटवर्ती अशी ओळख असणार्‍या नायब सैनी यांचा जन्म २५ जानेवारी १९७० रोजी अंबाला येथील मिर्झापूर माजरा गावात झाला. बीए. एलएलबी असे त्‍यांचे शिक्षण झाले आहे. सैनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ओबीसी समाजातील नेते, अशीही त्‍यांची ओळख आहे.  ते 2002 मध्ये युवा मोर्चा भाजप अंबालाचे जिल्हा सरचिटणीस झाले. 2005 मध्ये ते युवा मोर्चा भाजप अंबालाचे जिल्हाध्यक्ष होते. सैनी 2009 मध्ये किसान मोर्चा भाजप हरियाणाचे प्रदेश सरचिटणीसही होते. 2012 मध्ये ते अंबाला भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. 2014 मध्ये सैनी यांनी नारायणगड विधानसभेतून निवडणूक जिंकली. 2016 मध्ये त्यांनी हरियाणा सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले होते. २०१९ लोकसभा निवडणुकीत कुरुक्षेत्र मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. काही दिवसांपूर्वीच त्‍यांची हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी त्‍यांच्‍याकडे मुख्‍यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे.
भाजप बहुमत कसे गाठणार?
हरियाणा विधानसभेत एकूण ९० जागा आहेत. भाजपचे ४१ आमदार आहेत. जननायक जनता पक्षाचे १० आमदार आहेत. सात अपक्षही भाजपसोबत आहेत. त्‍यामुळे राज्‍यातील भाजपची सत्ता अबाधित राहणार आहे. काँग्रेसचे ३० आमदार आणि INLD आणि हरियाणा लोकहित पक्षाचे प्रत्येकी एक आमदार याशिवाय सात अपक्ष आमदार आहेत. बहुमताचा आकडा ४६ आहे. जेजेपीसोबतची युती तोडल्यानंतर भाजपला स्वबळाचे ४१, सात अपक्ष आणि हरियाणा लोकहित पार्टीचा आमदारांचा पाठिंबा आहे. तसेज जननायक जनता पक्षाचे काही आमदार भाजपमध्‍ये प्रवेश करतील, अशीही शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.
The post हरियाणाच्‍या मुख्‍यमंत्रीपदी नायब सिंग सैनी शपथबद्ध appeared first on Bharat Live News Media.

Go to Source