धक्कादायक! शिक्षकाने उठाबशा काढायला सांगितल्याने १० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिक्षकाने उठाबशा काढायला सांगितल्याने एका १० वर्षीय विद्यार्थ्याचा मंगळवारी (दि.२१) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही ओडिशामध्ये घडली आहे. रूद्र नारायण सेठी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. रुद्र हा ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील सरकारी शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता. सूर्य नारायण नोडल, असे रुद्र शिकत असलेल्या प्राथमिक शाळेचे नाव आहे. (Odisha School) याबाबत … The post धक्कादायक! शिक्षकाने उठाबशा काढायला सांगितल्याने १० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

धक्कादायक! शिक्षकाने उठाबशा काढायला सांगितल्याने १० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिक्षकाने उठाबशा काढायला सांगितल्याने एका १० वर्षीय विद्यार्थ्याचा मंगळवारी (दि.२१) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही ओडिशामध्ये घडली आहे. रूद्र नारायण सेठी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. रुद्र हा ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील सरकारी शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता. सूर्य नारायण नोडल, असे रुद्र शिकत असलेल्या प्राथमिक शाळेचे नाव आहे. (Odisha School)
याबाबत अधिकची माहिती अशी की, मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रुद्र सेठी त्याच्या चार मित्रांसमवेत खेळताना दिसला. यावेळी त्याला शिक्षकाने पाहिले. त्याच्या कथित कृत्याची शिक्षा म्हणून त्याला उठाबशा काढण्यास सांगण्यात आले. मात्र, यानंतर रुद्र कोसळला. यानंतर याबाबतची माहिती त्याच्या पालकांना देण्यात आली होती. (Odisha School)
रुद्र सेठीला शिक्षकाने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, यानंतरही त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कटकमधील मेडिकल कॉलेजमध्ये हालवण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रसूलपूर ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (बीईओ) निलांबर मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार आलेली नाही. आमच्याकडे औपचारिक तक्रार आल्यास आम्ही तपास सुरू करू आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर आवश्यक कारवाई करू,” रसूलपूरचे सहायक गटशिक्षणाधिकारी प्रवंजन पती यांनी शाळेला भेट देऊन घटनेची चौकशी सुरू केली. (Odisha School)

Class 4 Student Dies After Teacher Makes Him Do Sit-Ups In Odisha School https://t.co/qSWq3U298x pic.twitter.com/XY52P4FbBm
— NDTV News feed (@ndtvfeed) November 22, 2023

हेही वाचलंत का?

(Video) हान की बडीव! मेस्सीच्या मॅचमध्ये ब्राझीलच्या पोलिसांनी अर्जेंटीनाच्या प्रेक्षकांना धुतले
Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी’च्या माध्यमातून फुटले भाजपअंतर्गत वादाला तोंड: सुधीर पाटलांचा आमदार पाटील यांच्यावर निशाणा

The post धक्कादायक! शिक्षकाने उठाबशा काढायला सांगितल्याने १० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिक्षकाने उठाबशा काढायला सांगितल्याने एका १० वर्षीय विद्यार्थ्याचा मंगळवारी (दि.२१) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही ओडिशामध्ये घडली आहे. रूद्र नारायण सेठी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. रुद्र हा ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील सरकारी शाळेत इयत्ता चौथीत शिकत होता. सूर्य नारायण नोडल, असे रुद्र शिकत असलेल्या प्राथमिक शाळेचे नाव आहे. (Odisha School) याबाबत …

The post धक्कादायक! शिक्षकाने उठाबशा काढायला सांगितल्याने १० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source