पोलिसांना पाहताच दुचाकीचोर थेट पालकमंत्र्यांच्या कार्यालयात घुसला

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पोलिसांना पाहून आरोपी पळून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, पण पळून गेलेला आरोपी थेट पालकमंत्र्यांच्या कार्यालयात गेल्याचा प्रकार सोमवारी (दि. 11) दुपारी घडला. जवाहरनगर पोलिसांनी समयसूचकता दाखवित त्याला अटक केली. राम विठ्ठल मोकाशे (32, रा. पिशोर) असे आरोपीचे नाव असून त्याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवाहरनगर … The post पोलिसांना पाहताच दुचाकीचोर थेट पालकमंत्र्यांच्या कार्यालयात घुसला appeared first on पुढारी.

पोलिसांना पाहताच दुचाकीचोर थेट पालकमंत्र्यांच्या कार्यालयात घुसला

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : पोलिसांना पाहून आरोपी पळून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, पण पळून गेलेला आरोपी थेट पालकमंत्र्यांच्या कार्यालयात गेल्याचा प्रकार सोमवारी (दि. 11) दुपारी घडला. जवाहरनगर पोलिसांनी समयसूचकता दाखवित त्याला अटक केली. राम विठ्ठल मोकाशे (32, रा. पिशोर) असे आरोपीचे नाव असून त्याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवाहरनगर पोलिस ठाण्याचे डायल 112 चे बिट मार्शल मारोती गोरे आणि विष्णू काळे हे दोघे सूतगिरणी भागात गस्त घालीत होते. यावेळी त्यांना एक संशयित आरोपी चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी सूतगिरणी चौकात येणार असल्याची खबर मिळाली. त्यावरून गोरे आणि काळे यांनी सापळा रचला. मात्र, पोलिसांना पाहताच संशयित दुचाकीचोर जवळच असलेल्या पालकमंत्री भुमरे यांच्या संपर्क कार्यालयाकडे पळाला आणि आतमध्ये जाऊन बसला.
गोरे आणि काळे यांनी त्याला कार्यालयातून ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. चौकशीमध्ये त्याने नांदगाव (जि. नाशिक) येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात ऑगस्ट 2023 मध्ये शेख अजर यांनी दुचाकी चोरी गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली. जमादार मारोती गोरे आणि विष्णू काळे यांनी ही कारवाई केली.
Latest Marathi News पोलिसांना पाहताच दुचाकीचोर थेट पालकमंत्र्यांच्या कार्यालयात घुसला Brought to You By : Bharat Live News Media.