जळगावात जून्या वादातून तरुणाचा जमिनीवर डोके आपटून खून

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – पाचोरा तालुक्यातील सातगाव तांडा येथील तरुणाचा खून जुन्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील सातगाव तांडा येथील पोपट ओमकार राठोड (वय २२) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. १० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा राहुल अभिमान अल्हाड (वय-२५) याने गावातील बसस्थानका जवळ पोपट राठोड यास शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर मारहाण केली आणि जमिनीवर डोके आपटल्याने पोपटचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राहुल अभिमान अल्हाड यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक प्रकाश काळे हे करीत आहे.
हेही वाचा :
हायकोर्टाचे कर्मचारी, अधिकारी जीव मुठीत घेऊन काम करताहेत!
ब्रेकिंग : हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांचा राजीनामा, ‘भाजप-जजप’ युतीत फूट
ब्रेकिंग : हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांचा राजीनामा, ‘भाजप-जजप’ युतीत फूट
Latest Marathi News जळगावात जून्या वादातून तरुणाचा जमिनीवर डोके आपटून खून Brought to You By : Bharat Live News Media.
