रस्त्यांवर थुंकणार्‍यांवर क्लीनअप मार्शलची नजर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि डेब्रिज फेकण्यास मनाई असताना काही लोकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर पुन्हा क्लीनअप मार्शल नेमण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.  ( Cleanup marshal ) यामुळे आता रस्त्यावर थुंकणे अथवा कचरा टाकणे चांगलेच महागात पडणार असून अशा लोकांवर क्लीनअप मार्शलची नजर … The post रस्त्यांवर थुंकणार्‍यांवर क्लीनअप मार्शलची नजर appeared first on पुढारी.

रस्त्यांवर थुंकणार्‍यांवर क्लीनअप मार्शलची नजर

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा :  मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि डेब्रिज फेकण्यास मनाई असताना काही लोकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर पुन्हा क्लीनअप मार्शल नेमण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.  ( Cleanup marshal )
यामुळे आता रस्त्यावर थुंकणे अथवा कचरा टाकणे चांगलेच महागात पडणार असून अशा लोकांवर क्लीनअप मार्शलची नजर असणार आहे. 24 वॉर्डामध्ये टप्प्याटप्प्यात 720 क्लीनअप मार्शलची नियुक्ती होणार असून शहर गलिच्छ करणार्‍यांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.
मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी क्लीनअप मार्शल योजना यापूर्वीच सुरू केली होती. मात्र या कारणास्तव ही योजना बंद पडली. मात्र आता ही योजना पुन्हा सुरू होत असून उघड्यावर घाण करणारे, कचरा फेकणारे यांवर आता कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पालिकेच्या वॉर्डात ‘क्लीनअप मार्शल’ची नियुक्ती करण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणारे तसेच घाण करणार्‍यांवर आता क्लीनअप मार्शलद्वारे 200 ते एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पहिले आठ ते दहा दिवस दंडात्मक कारवाईची पोचपावती दिली जाणार असून त्यानंतर दंडाची वसुली ऑनलाइन केली जाणार आहे. प विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मुंबई महापालिकेने मार्शलची नियुक्ती खासगी संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. या दंडात्मक कारवाईतून मिळणार्‍या उत्पन्नातील काही वाटा महापालिकेलाही मिळणार आहे. जेवढी दंड आकारणी होईल त्यातील 50 टक्के उत्पन्न पालिकेला मिळेल तर 50 टक्के उत्पन्न संबंधित संस्थेला मिळणार आहे. त्यामुळे हे मार्शल बारकाईने नागरिकांवर लक्ष ठेवणार आहेत. ( Cleanup marshal )
Latest Marathi News रस्त्यांवर थुंकणार्‍यांवर क्लीनअप मार्शलची नजर Brought to You By : Bharat Live News Media.