ब्रेकिंग : हरियाणाचे मुख्‍यमंत्री खट्टर यांचा राजीनामा, ‘भाजप-जजप’ युतीत फूट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लाेकसभा जागा वाटपावरुन  हरियाणातील भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष युती अखेर आज  (दि.१२मार्च) तुटली.  मनोहर लाल खट्टर यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. दरम्‍यान, मुख्‍यमंत्री मनाेहर लाल खट्टर हे लाेकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मुख्‍यमंत्रीपदी हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष नायबसिंग सैनी, … The post ब्रेकिंग : हरियाणाचे मुख्‍यमंत्री खट्टर यांचा राजीनामा, ‘भाजप-जजप’ युतीत फूट appeared first on पुढारी.
ब्रेकिंग : हरियाणाचे मुख्‍यमंत्री खट्टर यांचा राजीनामा, ‘भाजप-जजप’ युतीत फूट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लाेकसभा जागा वाटपावरुन  हरियाणातील भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष युती अखेर आज  (दि.१२मार्च) तुटली.  मनोहर लाल खट्टर यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. दरम्‍यान, मुख्‍यमंत्री मनाेहर लाल खट्टर हे लाेकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मुख्‍यमंत्रीपदी हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष नायबसिंग सैनी, ज्‍येष्‍ठ नेते कृष्णपाल गुर्जर यांची नावे चर्चेत आहेत. आज दुपारी एक वाजता नवीन मुख्‍यमंत्री शपथ घेतील, असेही मानले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरुन भाजप आणि जजपमध्‍ये एकमत झाले नाही. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या निवासस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदारांची बैठक झाली. तर भाजपने केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांच्‍या उपस्‍थितीत बैठक घेतली. यानंतर ‘भाजप-जजप’ युतीत फूटीवर शिक्‍कामोर्तब झालं. अखेर मनोहर लाल खट्टर यांनी पदाचा राजीनामा दिला.

Manohar Lal Khattar resigns as CM of Haryana pic.twitter.com/mV311cH8jm
— ANI (@ANI) March 12, 2024

सोमवार, ११ मार्चला सायंकाळी मुख्‍यमंत्री खट्टर संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची अनौपचारिक बैठकही घेतली होती. त्यात गृहमंत्री अनिल विज, शिक्षण मंत्री कंवरपाल गुर्जर, कृषी मंत्री जेपी दलाल यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. या बैठकीत उपसभापती रणबीर गंगवाही उपस्थित होते.
‘भाजप-जजप’ युतीत मतभेदाचे कारण काय?
हरियाणामध्‍ये ऑक्‍टोबर २०१९ मध्‍ये विधानसभा निवडणूक झाली. भाजपने ९० पैकी ४० जागा जिंकल्‍या. बहुमतापासून वंजिच राहिल्‍याने अखेर १० आमदारांचे संख्‍याबळ असणार्‍या दुष्‍यंत चौटाला यांच्‍या जननायक जनता पक्षाबरोबर युती केली. दुष्‍यंत चौटाला हे उपमुख्‍यमंत्री झाले. चौटाला यांनी मंगळवार ११ मार्च रोजी भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जेपी नड्डा यांच्याशी लोकसभा जागावाटपाची चर्चा केली. २०१९मध्‍ये भाजपने हरियाणातील लोकसभेच्‍या सर्व १० जागा जिंकल्‍या होत्‍या. आता आगामी लोकसभा निवडणूकही भाजप स्‍वबळावर लढण्‍याच्‍या तयारीत आहे;पण जजपने दोन जागांची मागणी केली होती.
 
Latest Marathi News ब्रेकिंग : हरियाणाचे मुख्‍यमंत्री खट्टर यांचा राजीनामा, ‘भाजप-जजप’ युतीत फूट Brought to You By : Bharat Live News Media.