लातूर: मराठा आरक्षणासाठी सावनगिरा येथील तरुणाने जीवन संपवले
निलंगा, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आपले जीवन संपवले. किरण युवराज सोळुंके (वय २४, रा. सावनगिरा, ता. निलंगा, जि. लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पदवीधर होता. ही घटना आज (दि .२२) सकाळी शेतात घडली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र, आरक्षण मिळाले नसल्याने काहीजण टोकाचे पाऊल उचलत आहेत. किरण सोळुंके यानेही आपले जीवन संपविले. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, मी किरण सोळुंके मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत आहे. किरण सोळुंके याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. किरण सोळुंके याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या घटनेने सावनगिरा गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा
भारत-न्यूझीलंड सामना: धमकीच्या पोस्टप्रकरणी लातूरच्या तरूणाला अटक
लातूर : दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही; चिठ्ठी लिहीत तरूणाने जीवन संपवले
मराठा आरक्षण : लातूरमध्ये आंदोलनाचा वणवा; 200 पेक्षा जास्त गावांत नेत्यांना गावबंदी, जरांगे पाटलांना पाठबळ
The post लातूर: मराठा आरक्षणासाठी सावनगिरा येथील तरुणाने जीवन संपवले appeared first on पुढारी.
निलंगा, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आपले जीवन संपवले. किरण युवराज सोळुंके (वय २४, रा. सावनगिरा, ता. निलंगा, जि. लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पदवीधर होता. ही घटना आज (दि .२२) सकाळी शेतात घडली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र, आरक्षण मिळाले नसल्याने काहीजण …
The post लातूर: मराठा आरक्षणासाठी सावनगिरा येथील तरुणाने जीवन संपवले appeared first on पुढारी.