इंजिनच्या दिशेने नाणी भिरकावल्याने फ्लाईटला 4 तास उशीर

बीजिंग : सान्या ते बीजिंग या मार्गावरील चायना सदर्न एअरलाईन्सच्या विमानाला एका अजब कारणामुळे 4 तासांचा उशीर झाला. या विमानातील एका प्रवाशाने इंजिनच्या दिशेने काही नाणी भिरकावली आणि सुरक्षिततेचा धोका निर्माण झाल्याने हे विमान तब्बल चार तास अडकून पडले. अर्थात, चौकशीनंतर जे सत्य बाहेर आले ते आणखी धक्कादायक होते. ज्या प्रवाशाने नाणी फेकली, त्याने आपण … The post इंजिनच्या दिशेने नाणी भिरकावल्याने फ्लाईटला 4 तास उशीर appeared first on पुढारी.

इंजिनच्या दिशेने नाणी भिरकावल्याने फ्लाईटला 4 तास उशीर

बीजिंग : सान्या ते बीजिंग या मार्गावरील चायना सदर्न एअरलाईन्सच्या विमानाला एका अजब कारणामुळे 4 तासांचा उशीर झाला. या विमानातील एका प्रवाशाने इंजिनच्या दिशेने काही नाणी भिरकावली आणि सुरक्षिततेचा धोका निर्माण झाल्याने हे विमान तब्बल चार तास अडकून पडले. अर्थात, चौकशीनंतर जे सत्य बाहेर आले ते आणखी धक्कादायक होते. ज्या प्रवाशाने नाणी फेकली, त्याने आपण आपले नशीब बदलावे, यासाठी हे कृत्य केले असल्याचे कबूल केले.
विमान इंजिनाच्या दिशेने नाणे टाकणार्‍या या प्रवाशाचे नाव जाहीर केले गेलेले नाही. मात्र, या प्रवाशाने इंजिनच्या दिशेने 3 ते 5 नाणी भिरकावली असल्याचे विमान कंपनीच्या सूत्राने म्हटले आहे. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार या फ्लाईटने सकाळी 10 वाजता टेकऑफ घेणे अपेक्षित होते. मात्र, या सावळ्या गोंधळामुळे जवळपास सव्वाचार तास उशीर झाला तरी काहीच होऊ शकले नव्हते.
यापूर्वी 2021 मध्येदेखील चीनमध्ये अशीच घटना घडली होती. त्यावेळीदेखील एका प्रवाशाने विमान इंजिनच्या दिशेने नाणे फेकल्यास आपले नशीब बदलेल, या अपेक्षेने नाणी फेकली आणि यामुळे ‘वेफंग ते हैकोयू’ या मार्गावरील विमान अडकून पडले. त्यावेळी त्या फ्लाईटमध्ये 148 प्रवाशांचा समावेश होता.
Latest Marathi News इंजिनच्या दिशेने नाणी भिरकावल्याने फ्लाईटला 4 तास उशीर Brought to You By : Bharat Live News Media.