स्वयंचलित अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्राथमिक तयारीला प्रारंभ

मॉस्को : रशियन अंतराळ एजन्सी ‘रोकोस्मोस’ने चंद्रावर स्वयंचलित अणुऊर्जा प्रकल्प तयार करण्यासाठी चीनसह कार्यरत राहण्याबाबत करार संमत केल्यानंतर आता त्याच्या प्राथमिक तयारीला सुरुवात केली आहे. हा रिअ‍ॅक्टर चंद्रावर मानवरहित पद्धतीने स्थापित केला जाणार आहे. या माध्यमातून चंद्रावरील पटलावर वीज प्रकल्प उभारला जाणार आहे. दोन्ही देश संयुक्त पद्धतीने हे कार्यान्वित ठेवणार आहेत. लाईव्ह सायन्सने दिलेल्या वृत्तानुसार, … The post स्वयंचलित अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्राथमिक तयारीला प्रारंभ appeared first on पुढारी.

स्वयंचलित अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्राथमिक तयारीला प्रारंभ

मॉस्को : रशियन अंतराळ एजन्सी ‘रोकोस्मोस’ने चंद्रावर स्वयंचलित अणुऊर्जा प्रकल्प तयार करण्यासाठी चीनसह कार्यरत राहण्याबाबत करार संमत केल्यानंतर आता त्याच्या प्राथमिक तयारीला सुरुवात केली आहे. हा रिअ‍ॅक्टर चंद्रावर मानवरहित पद्धतीने स्थापित केला जाणार आहे. या माध्यमातून चंद्रावरील पटलावर वीज प्रकल्प उभारला जाणार आहे. दोन्ही देश संयुक्त पद्धतीने हे कार्यान्वित ठेवणार आहेत.
लाईव्ह सायन्सने दिलेल्या वृत्तानुसार, या बेसचे नाव आंतरराष्ट्रीय अनुसंधान स्टेशन आयएलआरएस असे असणार आहे. आयएलआरएस अन्य सर्व इच्छुक देश व आंतरराष्ट्रीय भागीदारांसाठी खुला असणार आहे. ‘रोकोस्मोस’चे महासंचालक युरी बोरिसोव यांनी 2033 ते 2035 पर्यंत आपण चंद्रावर वीज युनिट स्थापन करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे यावेळी म्हटले आहे. हे सर्व मनुष्यरहित, स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. यासाठी टेक्नॉलॉजिकल सॉल्युशन तयार असल्याचे बोरिसोव यांनी स्पष्ट केले.
चंद्रावर बेस तयार करण्यासाठी रोकोस्मोस चंद्रावर सर्व सामग्री पाठवणार आहे. यासाठी अणू संचलित रॉकेटस्चा वापर केला जाणार आहे. अणू रिअ‍ॅक्टर चंद्रावरील बेससाठी अतिशय अनुकूल असेल. कारण, तेथे सौर पॅनेलच्या माध्यमातून पुरेशी ऊर्जा तयार करणे व ती साठवणे इतके शक्य असणार नाही, असे सध्याचे नियोजन आहे.
Latest Marathi News स्वयंचलित अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्राथमिक तयारीला प्रारंभ Brought to You By : Bharat Live News Media.