
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष युती फुटीच्या उंबरठ्यावर आहे. आज विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मनोहर लाल खट्टर हे आपल्या पदाचा राजीनामा देवू शकतात, असे वृत्त वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे. ( BJP-JJP Alliance Broken In Haryana Before Lok Sabha Elections )
लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरुन भाजप आणि जजपमध्ये एकमत झाले नाही. जननायक जनता पक्षाने दिल्लीत बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या निवासस्थानी होणाऱ्या चर्चेत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या नेत्याची निवड केली जाणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग सध्या निरीक्षक म्हणून चंदीगडला जात आहेत.
मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणूक लढवणार की नवा चेहरा समोर येणार याचा निर्णय या बैठकीतच होणार आहे. या बैठकीत अपक्ष आमदारही सहभागी होणार आहेत. हरियाणा भाजपचे प्रभारी विप्लव देव हेही चंदीगडला पोहोचले आहेत, तर हरियाणा भाजपचे अध्यक्ष नायब सैनीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
सोमवार, ११ मार्चला सायंकाळी मुख्यमंत्री खट्टर संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची अनौपचारिक बैठकही घेतली होती. त्यात गृहमंत्री अनिल विज, शिक्षण मंत्री कंवरपाल गुर्जर, कृषी मंत्री जेपी दलाल यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. या बैठकीत उपसभापती रणबीर गंगवाही उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत लोकसभा निवडणुकीसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
BJP-JJP Alliance : ‘भाजप-जजप’ युतीत मतभेदाचे कारण काय?
हरियाणामध्ये ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. भाजपने ९० पैकी ४० जागा जिंकल्या. बहुमतापासून वंजिच राहिल्याने अखेर १० आमदारांचे संख्याबळ असणार्या दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाबरोबर युती केली. दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री झाले. चौटाला यांनी मंगळवार ११ मार्च रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी लोकसभा जागावाटपाची चर्चा केली. २०१९मध्ये भाजपने हरियाणातील लोकसभेच्या सर्व १० जागा जिंकल्या होत्या. आता आगामी लोकसभा निवडणूकही भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे;पण जजपने दोन जागांची मागणी केली आहे. या जागा वाटपावरुन दोन्ही पक्षामधील मतभेदाची दरी आणखी वाढल्याची चर्चा हरियाणातील राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा :
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राच्या 25 जागांवर भाजपच्या बैठकीत चर्चा
Lok Sabha Election : ममतांच्या ‘एकला चलो’वर काँग्रेसची ‘तिखट’ प्रतिक्रिया, “पंतप्रधान नाराज होण्याची…”
Lok Sabha election : शत्रुघ्न सिन्हा ते किर्ती आझाद…: जाणून घ्या ‘तृणमूल’च्या यादीतील चर्चेतील चेहरे
Latest Marathi News हरियाणात ‘भाजप-जजप’ युती फुटीच्या उंबरठ्यावर! मुख्यमंत्री खट्टर आज राजीनामा देणार? Brought to You By : Bharat Live News Media.
